"त्या" चिकन उचलून मार खाणाऱ्या पत्रकारांचे आता बदनामी होत असल्याचे नाटक ?



पत्रकार संघाने काढले हात, स्थानिक संपादकांना धमकावण्याचे प्रयत्न !

चंद्रपूर : दोन दिवसापूर्वी राजू ककडे संपादित साप्ताहिक भूमिपुत्रा ची हाक या न्यूज पोर्टल ला चंद्रपुरातील एका स्थानिक बारमध्ये "दुसऱ्याच्या टेबलवरून चिकन उचलल्यामुळे पत्रकारांनी मार खाल्ला" या आशयाची बातमी प्रकाशित झाली होती. सदर वृत्त सत्यावर आधारित असल्याचे भुमीपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांचे म्हणणे आहे. ज्या वेळेस ज्या बारमध्ये ही घटना घडली, त्यावेळी काही उपस्थितांनी याचे फोटो सुद्धा काढले. महत्वाचे म्हणजे एका लहानशा बाबींसाठी एवढ्या खालच्या स्तराची हरकत करणे हे स्वताला मोठ्या समजणाऱ्या एका पत्रकाराला न शोभणारे आहे. त्या घटनेमध्ये समावेश असणारा वसुली करणारा पत्रकार याच्यामुळे हे सगळे घडले. "पत्रकार आहे म्हणून आम्ही काही करू शकतो." अशी धारणा असणारे विकृत मानसिकतेचे हे लोक आता स्थानिक संपादकांना फोन करून बातमी चा सोर्स काय ?आम्ही तक्रार करू अशा बिना फुगा भरलेल्या धमक्या देत आहे. जेव्हा वृत्तामध्ये कोणाचे नावच नाही, तर स्वतःहून एखाद्या संपादकाला फोन करून बातमीचे सोर्स काय हे विचारणे म्हणजे स्वतः आरोपी आहे हे सिद्ध करणे आहे? आम्ही पत्रकार, लोकांची चिरफाड करतो आमची लागली तर आमची "लाल" कां बरे होते ? चुकीच्या घटना किंवा चुकीचे कृत्य जर पत्रकार करत असेल तर त्यांच्यावरही जाब राहायला हवा? आम्ही न्यायाधीश नाही? हे बहुतेक पत्रकार विसरले आहेत. तसंच काहीसं या घटनेमध्ये या दोन पत्रकारांचे झाले, घटना चुकीची नाही. जे घडलं ते चुकीचे आहे. मग आपली चुकी झाली म्हणून ताठ मानेने बघण्यापेक्षा मान खाली केलेली कधीही बरीच असते. कारण आपण कोणासोबत राहतो. आपण करीत काय आहे याचे होश-हवास पत्रकारांनी अवश्य ठेवायला हवे. तक्रार करू म्हणण्याने काही होणार नाही, फक्त बातमीचे वास्तव ओळखून फुकटच्या कोंबडीवर तुम्ही ताव मारला असेल तर तुम्ही खालमानाने ही चुकी कबूल करायला हवी. त्यांचे माझेपाशी हे आहे-ते आहे म्हणण्यापेक्षा तुमचे ही कोणापाशी काही असू शकते? हे लक्षात ठेवा, जर फुकटचे दोन चिकन चे पिस खाल्ले असेल व त्यासाठी मार खाल्ला असेल तर तर तुम्ही "फुकट्या" आहात, हे तुम्ही स्वतः कबूल करायला हवं.

Post a Comment

0 Comments