चंद्रपूर (का.प्र.)
मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्याची घोषणा मंत्रीमंडळाने केल्यानंतर 'जैसे थे' या तत्वावर चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्री परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले. ५ जुलै २०२१ रोजी जिल्ह्यात पहिल्यांदा नुतनीकरण झालेले काही बार-परमिट रूम उघडण्यात आले. कोविड-१९ च्या नियमांचे पालन करीत दारू विक्री करण्यात यावी, या अटीवर उघडण्यात आलेल्या या परवाना दारू दुकानांमध्ये एक आठवडाभर मद्यपींनी तोबा गर्दी केली. दोन-तिन दिवसांतचं करोडो रूपयांची दारू मद्यपींनी ठोकसली.
मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात देशी दारू ८,०२,१०५ बल्क लिटर, विदेशी दारू २,१२,५५२ बल्क लिटर, स्ट्राँग बिअर १,८८,७२८ बल्क लिटर, माईल्ड बिअर १९,०४१ बल्क लिटर, वाईन १९६४ बल्क लिटर परवाना धारक दारू विक्रेत्यांकडून विकण्यात आली. तसेच ६ ऑगस्ट पर्यत चंद्रपूर जिल्ह्यात नुतनीकरण करून २५० परमिट रुम/बार, ३२ बियर शॉपी, २ क्लब, ४ वाईन शॉप तर ७२ देशी दारू दुकानांना परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
बियर शॉपी साठी शेकडो इच्छुकांचे अर्ज !
राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये नविन बियर शॉपी उघडण्यासाठी शेकडो इच्छुकांनी अर्ज केलेले असुन कागदपत्रांची पूर्ण पुर्तता करणाऱ्यांना लवकरचं ही परवानगी देण्यात येणार असून आलेल्या अर्जाचा विचार केला असता बघाल तिथे बियर शॉपी अशी परिस्थिती येणाऱ्या काळात बघायला मिळेल.
जुलै महिन्यात विकल्या गेलेली अवैध दारू आली कुठून ?
५ जुलै पासुन दारू दुकानांना परवानगी मिळाल्यानंतर ही अवैध दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात शहरात दारु विक्री केली. दारूबंदी नंतर अवैध मार्गाने विक्री ही दारू ही परजिल्ह्यातुन यायची. परंतु दारू बंदी उठल्यानंतर जिल्ह्यात विकल्या गेलेली दारू ही परवानाधारकांकडूनचं अवैध दारू व्यावसायिकांकडूनचं पुरवठा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
0 टिप्पण्या