भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी
गडचांदूर -- नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी आज दुपारी १,३० वाजता "विशेष सभा " आयोजित केली. विषयसुची मधील कामकाज चालवण्यासाठी सदर सभा बोलाविण्यात आली असून यासंबंधीची नोटिस सर्व नगरसेवकांना देण्यात आले. यात एकुण पाच विषय ठेवण्यात आले. मात्र सदरची सभा नियमबाह्य असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी सभा रद्द करण्यात यावी अशी विनंती मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नियमबाह्य सभेतचं मिळेल दारू दुकानांना "एनओसी" !
आज 20 जुलै रोजी गडचांदुर नगर परिषद ने आयोजित केलेल्या विशेष सभा नियमबाह्य असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला असून या विशेष सभेचे आयोजन करण्याचे कोणतेही विशेष कारण नसताना फक्त दारू दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले असून महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर च्या सी.ओ. च्या अनुपस्थितीत ही सभा होणार असून प्रभारी असलेले मुख्याधिकारी हे आजच्या सभेला अनुपस्थित राहतील असे सांगितले जात आहे. फक्त दारू दुकानांच्या परवानगीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत या दारू दुकानांना "एनओसी" दिल्याचं जाईल हे निश्चित आहे. गडचांदुर नगर परिषद मध्ये नगरसेवक आत्ता दारूबंदी हटल्यानंतर दारू दुकानांकडे कमाईचे साधन म्हणून बघत आहेत, ही बाब अत्यंत शोचनिय अशी आहे. यानंतर ही काही विद्यमान नगरसेवकांचे डोळा हा "दारू दुकानांच्या" परवानगी कडे लागला आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या दारू दुकानांसाठी गडचांदुर नगर परिषद मध्ये चाललेली नियमबाह्य रित्या धडपड ही अत्यंत केविलवाणी आहे. यापूर्वी अवैध दारू विक्री मध्ये सक्रिय असलेला एक नगरसेवक आता गडचांदूर शहरात देशी दारूचे दुकान आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे गडचांदूर वासी सांगत आहेत. फक्त भाजप व्यतिरिक्त अन्य कोणताही पक्ष या नियमबाह्य सभेचा विरोध न करता दारू दुकानांच्या परवानगी ला विरोध करणार नाही हे तेवढेच निश्चित आहे.
नगराध्यक्षांनी विषेश सभा बोलावली खरी परंतु महाराष्ट्र नगर पालीका नगर पंचायत औधौगीक नगरी अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नुसार विषेश सभा ही नगरपरिषदेच्या एक चतुर्थाशाहुन कमी नाही इतक्या परीषद सदस्यांनी लेखी विनंती सादर केली असता अध्यक्षांना लावता येते.परंतु सदरची सभा लावण्यासाठी कोणत्याही नगरपरिषद सदस्यांनी मा. नगराधक्षांना विनंती अर्ज केलेला नाही.असे असताना नगराध्यक्ष महोदयांना कुठलाही अधिकार नसताना सदरची सभा स्वतःच्या अधिकाराने लावलेली ती नियमबाह्य बेकायदेशीर आहे.असे नगरसेवक डोहे यांनी निवेदनात नमूद करून सदरची सभा रद्द करण्याची मागणी केली आहे.यापुर्वी सुध्दा सर्वसाधारण सभेची नोटिस नियमाप्रमाणे सात दिवसापुर्वी काढायचा असतांना त्यावेळेस सुध्दा नगराध्यक्षांनी पाच दिवसातच सभा आयोजित केली. तेव्हा सुध्दा डोहे नगरसेवकांनी सभा नियमबाह्य असल्याचे मुख्याधिकारी यांना पत्र दिले आणी मुख्याधिकारी यांनी त्यांच्या पत्राची दखल घेत सदरची सभा रद्द करण्यात आली व आता परत तिच चुकी नगराधक्षा कडुन घडली असल्याने परत आज होणारी सभा रद्द करा असे निवेदन भाजपाचे नगरसेवक डोहे यांनी केले खरे पण ही सभा नियमानुसार की नियमबाह्य हे चित्र आता आजच्या सभेत स्पष्ट होईल हे मात्र तेवढेच खरे.
0 Comments