गडचांदूर व कोरपना तालुक्यात अवैध जुगार अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल!



स्थानिक पोलिसांचे "अर्थ"पूर्ण दूर्लक्ष !

चंद्रपूर (वि.प्र..)
मागील आठवड्यात वरोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून जुगार अड्ड्यावर कारवाई केली. एका जुगार अड्ड्यावर तर लाखोची रक्कम जिंकली म्हणून जिंकणार्‍याला मारझोड करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेला जुगाराचे अड्डे दिसतात मग स्थानिक पोलिस यावर कारवाई करण्यास पुढे कां येत नाही? हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो.

उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर व कोरपना तालुक्यात ही मोठ्या स्तरावर असे जुगार व सट्ट्याचे अड्डे सुरू असून त्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर शहरात मध्ये नुकतेच सत्यजित आमले ठाणेदार म्हणून आले, त्यांनी गडचांदुर शहराचा कारभार सांभाळून आता एक महिन्यापेक्षा जास्त अवधीचा कार्यकाळ होत आहे. नवीन ठाणेदाराच्या आल्यानंतर शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद होतील, असे गडचांदूरवासियांना वाटत होते, परंतु तसे होण्याची काही चिन्हे दिसत नाही. त्याचप्रमाणे कोरपना या तालुक्यात सुद्धा मागील अनेक वर्षापासून सुरू असलेले जुगार अड्डे अद्यापही सुरू आहे स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असून त्यामध्ये आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. गडचांदुर व कोरपणा या दोनही शहराला लागून तेलंगणाची सिमा आहे. तेलंगणा या शहरातून जुगाराचे शौकीन या दोन्ही ठिकाणी येऊन आपला शौक पुर्ण करतात, लाखोंच्या घरात हे जुगार खेळल्या जात असून जुगार शौकीनांची गर्दी याठिकाणी असते, याची माहिती स्थानिक पोलिसांना नसावी यांचे आश्चर्य वाटते. स्वतः पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता या परिसरातील नागरिक करू लागले आहे.

Post a Comment

0 Comments