Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

साधेपणा व विशेष कार्यशैलीने आपली छाप निर्माण करणाऱ्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर !चंद्रपूर (वि.प्रति.) : भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांचा साधेपणा सध्या चर्चेचा विषय आहे. लोकप्रतिनिधी असुन आपण सर्वांपेक्षा वेगळे असा लवलेश ही त्यांचेमध्ये नाही. जनतेनी त्याच्या सेवेसाठी आपल्याला निवडून दिलेले असुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, हाच उद्देश घेवून नवख्या असुन ही आपल्या नावाप्रमाणे आपल्या प्रतिभेची छाप पाडणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांच्या साध्या व प्रामाणिक स्वभावाचा दोन दिवसांपूर्वी प्रत्यय आला, त्याच बद्दलचा हा शब्द प्रपंच !

नुकतेच काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांसोबत दगडावर बसून चहाचा आस्वाद घेतांना त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्याच स्वभाव गुणांचे वर्णन करणाऱ्या या छायाचित्राप्रमाणेचं त्यांचा स्वभाव ही नैसर्गिक आहे. प्रतिभाताईना एकदा भेटणारा त्यांना कधीही विसरू शकणार नाही, हे या निमीत्ताने अवश्य सांगावेसे वाटते. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यांनी प्रतिभाताईं आमदार यांचेपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
अचानक वरोरा येथे झालेल्या दौऱ्यात आम्ही काही पत्रकार चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची सदिच्छा भेट घेवून चर्चा करावी यासाठी वरोरा येथील खासदारांच्या निवासस्थानी पोहोचलो, त्यांच्या घराशेजारीचं असलेल्या नविन इमारतीत त्यांचे कार्यालय असल्याचे तेथे उपस्थितांनी सांगीतले. चला खासदार महोदयांची भेट होईल या आशेने कार्यालयात प्रवेश केला. समस्याग्रस्तांची गर्दी दिसली, बाळुभाऊ कार्यालयात असतीलचं या अपेक्षेने आम्ही आत प्रवेश केला. प्रशस्त असलेल्या कार्यालयात भद्रावती-वरोरा विधानसभेच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर या आलेल्यांच्या समस्या मनःपुर्वक ऐकत असल्याचे निदर्शनास आले. आम्ही पत्रकारांनी आत प्रवेश केला. प्रतिभाताईनी हाताने बसण्याचा इशारा करीत येणाऱ्यांचे समस्या-गाऱ्हाणे ऐकण्यास सुरूवात केली. आमचा क्रमांक येतपावेतो वाट बघितली, कुणीही छोटा नाही, कुणीही मोठा नाही या तत्वावर जे आले त्यांचे समस्या-गा-हाणे ते ऐकीत होत्या. त्यावर समाधानपुर्वक तोडका ही देत होत्या. आमचा क्रमांक येण्यापुर्वी एका दुसऱ्या विधानसभा मधील काही नागरिक त्यांना समाजभवनासाठी मागणी करीत होते. आपल्या सुस्वभावाने त्यांनी तुमच्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधीला याची कल्पना द्या, अधिकृत मागणी करा, त्यानंतर मला सांगा. मी आमदार या नात्याने त्याचा पाठपुरावा अवश्य करेल आणि योग्य ती मदत देण्याचा ही प्रयत्न करेन. अशी प्रतिभाताईंनी सुहास्याने आलेल्या आगंतुकांना दिलेली सुचक सुचना त्यांच्या स्वभावासोबतचं प्रगल्भता हा विशेष गुण दाखविणारी होती. त्यानंतर आमचा क्रमांक आला आणि आम्ही त्यांना आपला परिचय देत येण्याचे कारण सांगीतले. त्यांचा अत्यंत साधेपणा हा मनाला जेवढा भावून गेला तेवढाच त्यांच्या स्पष्टपणा ही फार काही सांगून गेला. काही औपचारिक चर्चा ही झाल्या, त्यात त्यांचे कुटुंब, त्यांचे माहेर-सासर याबद्दल त्यांनी सामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे चर्चा करतात त्याप्रमाणे चर्चा केल्या. कुठेही कोणताही बनावटपणा त्यात नव्हता. अत्यंत साध्या, सुस्वभावी, गृहीणी असलेल्या प्रतिभाताईंना त्यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा झाली, येणाऱ्या समस्यांचे गांभीर्य काय ? याची त्यांना जाण असल्याचे यावेळी लक्षात आले, बोलण्यात त्यांनी आपण नवखे असुन काही आमदारांचे आपल्याला होत असलेले सहकार्य याचा आवर्जुन उल्लेख केला. विशेष करून राजुरा विधानसभेचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांची सांसदीय कार्यात होणारी मदत याचा आवर्जुन उल्लेख केला. पत्रकार, लोकप्रतिनिधी, सांसदिय कार्य, समाजसेवक, लोकप्रतिनिधींचे कर्मचारी यांच्याबद्दल झालेल्या चर्चेत "चहा पेक्षा केटली भारी" या शब्दात मिळालेले बोलके उत्तर त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण दर्शविणारा होता. सामान्य गृहीणीप्रमाणे आपण ही घरचे सर्वच कार्य करीत असतो. घरी येणाऱ्यांना स्वतः चहा बनवून देणे हे मला आवडते, हे ही त्यांनी आवर्जुन सांगीतले. 

Post a Comment

0 Comments