कोंबड बाजाराला "परवानगी" मिळविण्यासाठी जिल्ह्यात धावपळीला वेग!
चंद्रपूर (वि.प्र.)
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी कोंबडे लढविण्यासाठी गैरकानूनी पद्धतीने जिल्ह्यात आठ-दहा ठिकाणी सुरू झालेले कोंबड बाजार व त्यांचे आका, राजकीय वरदहस्त यांची मोठी चर्चा होती. राजुरा येथील "गोलू" याचा कोंबड बाजार व त्या ठिकाणी होणारी शौकिनांची गर्दी, लाखोंची उलाढाल याची अनेक वृत्तपत्रांची दखल घेतली होती. त्यानंतर राजुरा येथील "गोलू" चा कोंबडबाजार हा चर्चेचा विषय होता. पोलिसांच्या कारवाईनंतर या "गोलू" ला राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याचे ही ऐकविण्यात येत होते. अनेक तक्रारी नंतर आणि वृत्तानंतर अखेर राजुरा चे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर "गोलू" चा कोंबड बाजार बंद करण्यात आला होता. वृत्तपत्रात आलेल्या वृत्तांनी व अन्य कारणांनी फक्त राजुरा येथील "गोलू" याचाचं कोंबडबाजार चर्चेचा विषय होता. त्याव्यतिरिक्तही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दहा ते पंधरा ठिकाणी अशा पद्धतीने कोंबड बाजार राजकीय पुढाकाराने व वरदहस्ताने सुरू असल्याचे सांगण्यात येते. नंतर हे कोंबडबाजार बंद करण्यात आले.
नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार हे "कोंबडबाजार" सुरू करण्यासाठी धावपळीला वेग आला असून दीपावली नंतर चंद्रपूर शहरातील छोटा नागपूर, राजुरा तालुक्यातील विरूर गाडेगांव, कोरपना तालुका व यापूर्वी सुरू असलेले कोंबडबाजार सुरू करण्यासाठी काही अराजकीय तत्वांनी धावपळ करण्याला सुरुवात असल्याचे वृत्त आहे.

  • यावर्षी "अव्वा" चा "सव्वा" दर !
  • या कोंबडबाजार ला "परवानगी" मिळविण्यासाठी परवानगी देणाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या परंतु परवानगी देणाऱ्यांचा "अव्वा"चा दर यावर्षी "सव्वा" झाल्यामुळे कोंबडबाजार चालविण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी पुन्हा एकदा "हाफिज" कडे धाव घेण्याचा निर्णय घेतला असून मागील काही महिन्यापासून हाफीज याने जिल्ह्यामध्ये आपले कार्यालय उघडल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीचे विशीष्ट पीक निघाल्यानंतर कोंबडे लढविण्याचे शौकीन असणारे मेहनतीचा पैसा या कोंबड बाजारावर लुटवितात, त्यामुळेच त्या पिकांचे पैसे मिळाल्यानंतर दिवाळीनंतर "काति"चे कोंबडे खाणारे, व कोंबडे लढविण्यासाठी शौकिनांची गर्दी होते. दिवाळीनंतर जिल्ह्यामध्ये कोंबडबाजार सुरू होतीलच व त्यासाठी धावपळ सुरू झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

"हाफिज" च्या मध्यस्थीनंतर दिपावली नंतर जिल्ह्यात पुन्हा सुरू होणार कोंबड बाजार ?

ज्यांनी पडद्याच्या पाठीमागे राहून "कोंबडबाजार" चालविण्यासाठी सहकार्य केले, ते स्वतः (white collar) आता यामधून मिळणाऱ्या पैशांच्या लालसेपोटी हेच कोंबड बाजार गैरकायदेशीर चालविण्यासाठी समोर येत आहे. जो "गोलू" मागील वर्षी कोंबड बाजारामुळे कुप्रसिद्ध झाला, त्याच "गोलू"चे यावर्षी मोठ-मोठे लागलेले बॅनर हे गैरकानूनी असलेल्या या व्यवसायाला राजकीय पाठबळ असल्याचे सिद्ध करते.

Post a Comment

0 Comments