- राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले पत्र !
गडचांदूर (प्रति.)
गडचांदूर शहरातील या देशी दारू दुकानांना शहराच्या बाहेर ३ कि.मी. हलविण्यात यावे,या संदर्भात विविध संघटनांनी व पत्रकार संघाने ही निवेदन दिले होते. सदर निवेदनाची चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून 3 जानेवारी 2022 रोजी पत्र क्र. एमजी/कार्या-8/टे-1/2022/04 नुसार चंद्रपूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना पत्र लिहून गडचांदूर शहरातील देशी दारू दुकाने शहराच्या बाहेर हलविण्यास संबंधात उचित कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर शहरात अत्यंत वर्दळीच्या असलेल्या अचानक चौक परिसरात गुलाब शेंद्रे यांचे देशी दारू दुकानामुळे याच परिसरात पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दुर्गा मातेचे मंदिर आहे. भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते तसेच या देशी दारू दुकानाच्या लगतचं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने सामान्य शेतकरी, शिक्षक, निराधार, महिला व विद्यार्थ्यांची मोठी ये-जा सुरु असते. अनेकदा या ठिकाणी दारूड्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना, बँकेचे ग्राहकांना चिल्लर पैशाकरिता त्रास देणे व महिलांना छेडछाड करणे सुरु केले आहे. परिसरातील रहिवासी बांधवाना व व्यापारी बांधवाना ही या दारू दुकानांचा त्रास होत आहे. तसेच स्टेट बैंक ऑफ इंडिया जवळ रऊफ खान व इतर यांचे देशी दारू दुकान सुरू झाले असून गडचांदूर शहरातील गजबजलेला परिसर असल्याने या परिसरात बँकेत येणारे पुरुष, महिला, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार ग्राहकवर्ग सदर दारू दुकानामुळे त्रस्त झालेला आहे. बँकेचे परिसरात छेडखाणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाळा, कॉलेजसाठी जाण्या-येण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे. तसेच या ठिकाणी आठवडी बाजार सुद्धा भरत असतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असलेल्या या परिसरातील हे देशी दारूचे दुकान नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच शहरातील राजीव गांधी चौक येथे भाऊराव रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे दिगांबर लांजेकर व इतर यांची दुकाने सुरु झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
जेमतेम लोकसंख्या असलेल्या गडचांदुर शहरात शहराच्या मध्यभागी चार ते पाच देशी दारूंची दुकाने आहेत. या देशी दारू दुकानांमुळे व दारूड्या मुळे पुरुष महिला, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या साऱ्या बाबींचा विचार गडचांदुर शहरातील देशी दारू ची दुकाने शहराच्या बाहेर हलविण्यात यावे, या आशयाचे निवेदन विविध संघटनांसोबत पत्रकार संघाने ही अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला गडचांदूर शहरातील या देशी दारू दुकानांना शहराच्या बाहेर ३ कि.मी. हलविण्यात यावे, या आशयाचे पत्र दिले होते. सदर पत्राची दखल घेत 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदनाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
0 Comments