गडचांदुर न‌. प. मध्ये चालली बेबंदशाही?


  • कार्यालयीन दिवशी कर्मचारी अनुपस्थित, कुत्रे फिरले खुलेआम?
  • सगळेच कर्मचारी गेले कर्मचाऱ्याच्या लग्नाला?

  • आम. सुभाष धोटे यांनी स्वतः याकडे लक्ष देण्याची गरज!
---_----_--------
  • Video बघण्यासाठी खालील link click tutube type करा.

  • https://youtu.be/EJWWKgcUsxk
  • ---_________-----_-----------------_______
चंद्रपूर (वि.प्र.)
सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी गडचांदूर नगरपरिषद मध्ये जनसार्थक युवा मंच शहराच्या समस्या विषयी निवेदन द्यायला गेले असता त्या ठिकाणी आवक-जावक विभागाचे कर्मचारी व्यतिरिक्त संपूर्ण कार्यालय त्यांना रीकामे असल्याचे व कार्यालयात कुत्रे फिरत असतांना नजरेस पडले. हा काय प्रकार आहे? गडचांदूर न.प. कार्यालयात कोणीच कसे नाही? यासंदर्भात जनसार्थक युवा मंच सदस्यांनी विचारपूस केली असता एका कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या लग्नानिमित्त चंद्रपूरला सारेच कर्मचारी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या लग्नासाठी संपूर्ण कार्यालय रिकामे आहे, तर कार्यालयीन कर्मचारी सुट्टीच्या अर्ज टाकून गेले की हजेरी लावून गेले हा सहज प्रश्न निवेदन देणाऱ्यांना पडला व त्यांनी त्या संदर्भात विचारपूस केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी मिळाले नाही. सत्ताधाऱ्यांचा वचक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नाही अशी गडचांदूरकरांची नेहमीचं तक्रार असते. संपूर्ण कार्यालयचं रिकामे राहत असेल तर सत्ताधारी करीत तरी काय आहे? नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत राहणारी गडचांदुर नगर परिषद कार्यालयात खुर्च्या रिकामा असतांना कुत्रे फिरत आहे असे चित्र जर नगरपरिषद मध्ये दिसत असेल तर या कार्यालयातील मुख्य अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी खरंच आपले कर्तव्य बजावत आहेत कां? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा? त्यासोबतच सत्ताधारी ज्यांच्यावर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची, समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे ते सत्ताधारी याठिकाणी मूक कां बरे आहेत? हा दुसरा मुद्दा? कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा अर्ज करून या लग्नात हजेरी लावली कां? या प्रश्नाची उत्तरे गडचांदूरकरांना भेडसावत आहे.यासंदर्भात मिळालेल्या विनोदी व हास्यास्पद प्रतिक्रिया....!

यासंदर्भात गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सविताताई टेकाम यांना सोमवार दिनांक 14 रोजी नगरपरिषद मध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थिती विषयी प्रश्न विचारला असता अधीक्षकांना प्रतिक्रीया विचारा अशी "अकलेचे तारे तोडणारी" प्रतिक्रिया दिली. नप कर्मचाऱ्याचे लग्न चंद्रपूरला होते, याची कबुली मात्र त्यांनी दिली. परंतु ज्या ठिकाणी ते नगराध्यक्ष आहेत त्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती कां बरे होती? याबद्दल उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.आपण नगराध्यक्ष आहोत बहुतेक याचा विसर नगराध्यक्षांना यावेळेस पडला असेल. नागरिकांनी दिलेल्या मतामुळे जनप्रतिनिधी निवडून येतात. लोकांनी लोकांसाठी बनविले राज्य म्हणजे लोकशाही, हे नागरिकशास्त्र विषयात शिकविले जाते याचाच विसर आता जनप्रतिनिधीना पडला आहे.

गडचांदूर न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी सोमवारला न.प. मध्ये कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हते, याची कबुली दिली.परंतु त्यावर काय करता येईल यासाठी ते स्वत: अनभिज्ञ आहेत असे लक्षात आले. बॅनर पोस्टर च्या माध्यमातून उदो उदो करणारे शरद जोगी गडचांदूर न.प.चे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यापाशी असलेल्या "पावर" चा वापर त्यांनी "फ्लावर" साठी न करता गडचांदूरकरांच्या समस्यासाठी केल्यास बरे राहील. खुर्ची आणि सत्तेचा मोह हा चांगल्या-चांगल्यांच्या उरावर बसलेला आहे. अवैध मार्गांनी कमविलेला पैस जेलची वारी करण्यापासून कोणालाही थांबवू शकत नाही, हे प्रादेशिक राजकारणामधून शरद जोगी यांनी अवश्य शिकायला हवे. श्वे

यासंदर्भात गडचांदूर न.प.चे कार्यालयीन अधीक्षक शेडमाके यांच्याकडे विचारपूस केली असता काल मी राजुरा येथे आढावा बैठकीत होतो. मला याची कल्पना नाही परंतु न.प. च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे चंद्रपूरला लग्न होते, त्या लग्नात मी नव्हतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली. यासंदर्भात गडचांदूर न.प.च्या मुख्याधिकार्‍यांना विचारावे असे स्पष्ट मत अधीक्षक शेडमाके यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात गडचांदूर चे सिओ विशाखा शेळके यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. गडचांदूर नप. च्या मुख्याधिकारी विशाखा शेळके यांनी संपूर्ण नगरपरिषद रिकामे राहते याचे कारण कर्मचाऱ्यांना अवश्य विचारावे आणि त्याच्या खुलासा गडचांदूर करांना अवश्य करावा. तसेच नपचे कर्मचारी हजेरी लावून गेले होते की त्यांनी परिसर सुट्टीचा अर्ज केला होता याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना अवश्य द्यावी.

आम. सुभाष धोटे यांनी गडचांदूर मधील भोंगळ कारभाराकडे द्यावे लक्ष!


राजुरा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर न.प. मध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. करोडो रुपयाचा निधी गडचांदूर च्या विकासासाठी खर्च करणारे राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्यात पक्षाची गडचांदूर मध्ये सत्ता आहे, नगराध्यक्षा पासून सगळेच त्यांना मार्गदर्शक मानतात. गडचांदूर न.प. मध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार आज गडचांदूर घरांसाठी चर्चेचा विषय होत आहे याकडे स्वतः आम. सुभाष धोटे यांनी लक्ष द्यावे व सत्ताधाऱ्यांना मार्गदर्शन केल्यास बरे राहील, असा सूर गडचांदूर मध्ये ऐकायला मिळतो. सत्ताही फक्त पैसा कमविण्यासाठी नाही हे ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांना कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकशाही सार्थक होऊ शकते.

Post a Comment

0 Comments