उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाकडून नागरिकांना इशारा !
मुंबई : हवामान खात्याच्या माहितीनुसार मराठवाडा-विदर्भासह मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, उष्ण तापमान असेल. या वातावरणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी, भरपूर पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना आता उन्हाच्या झळा सोसण्यासाठी तयार राहा, येत्या २ दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असून मुंबईमध्ये तापमान वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्शिअस राहील आणि नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबंधी आयएमडीकडूनही माहिती देण्यात आली आहे.
कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष : कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५अंशावर व कमाल तापमान किमान ३७ अंश असेल. असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील यासंबंधी एक ट्विट करत मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आपण हवामानात होणारे बदल आणि सतत होणार्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता उष्णाचा तडाखा वाढणार आहे.
0 Comments