युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : खासदार बाळू धानोरकर#baludhanorkar




डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सव

चंद्रपूर : सद्यस्थिती व भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांनी यूपीएससी, एम. पी. एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी जोमाने तयारी करावी. महाविद्यालयातून देखील यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. नोकऱ्यांची व बेरोजगारी ची भीषण समस्या लक्षात घेता व्यावसायिक शिक्षणावर भर देऊन स्वयंरोजगारात प्रोत्साहन तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल होणार आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. परंतु या उद्योगात कौशल्यपूर्ण शिक्षण घेणारे विद्यार्थी स्थानिक फार कमी असल्यामुळे बेरोजगारांची संख्या जास्त आहे. युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.


आज शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्मरणिकेचे प्रकाशन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अशोक घोटेकर, प्रा. राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी, अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, सुनील पाटील, गोपाल अमृतकर, ताजुभाई, राज यादव यांची उपस्थिती होती.


पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर नंतर चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बोद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पावन स्पर्श या भूमीला लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला शिक्षणाचा अधिकाराचा वापर करून या भूमीतून सर्वाधिक युवक येत्या काळात प्रशासकीय सेवेत जाण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments