चंद्रपूर जिल्हा पोलिसांची प्रशंसनिय कार्य !  • सायबर सेलच्या तत्परतेने वाचले तरूणाचे प्राण !
चंद्रपूर (का.प्र.) : सध्या चंद्रपूर जिल्हा पोलीस कारणाने चर्चेत आहे. घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात, अपराधी प्रवृत्तींना वचक बसविण्यात जिल्हा पोलीस अयशस्वी ठरत असल्याचे जिल्ह्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येते. काही अपवाद वगळता जिल्हा पोलिसांची प्रतिमा सामान्यांमध्ये मलीन आहे. आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे असे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये नेहमीचेच आहे.

परंतु नुकतेच चंद्रपूर च्या सायबर सेलने तत्परता दाखवत एका तरुणाला आत्महत्या करण्यापासून बचावले.

मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी जवळपास सव्वा वाजता सुमारास विनित व त्याचा मामा जयराज यांनी सायबर सेल गाठून वेकोलीमध्ये कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ हा आत्महत्या करणार असल्याच्या व्हिडिओ मेसेज लहान भावाला आल्याचे सांगितले. सायबर सेल नी तत्परता दाखवित मोबाईल चे लोकेशन टेस्ट केले. त्यामध्ये त्यांना उड्डाणपुलाच्या खालील रेल्वे पटरीचे लोकेशन मिळाले. सायबर सेल चंद्रपूर येथील अंमलदार यांनी सदर व्यक्तीचा मोबाईल लोकेशन घेवून ते रेल्वे ट्रॅक बस स्टॉप पुलाखाली असल्याचे दिसुन आले तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन तात्काळ सोबत घेऊन पोलीस नाईक संतोष पानघाटे, पोलीस अंमलदार भास्कर चिचवलकर तसेच पोलीस अंमलदार राहुल पोंदे यांनी लोकेशनला पोहचुन पीडित व्यक्तीचा शोध घेतला असतांना तो रेल्वे ट्रॅकच्या बाजुला चालतांना दिसुन आला. त्याला आवाज दिला असता तो इसम हा पळून जावू लागला. त्याचा पोलीस अंमलदारांनी रेल्वे रुळावरुन पाठलाग करुन रेल्वे स्टेशन चंद्रपुरच्या बाजुला त्याला ताब्यात घेतले व त्याची समजूत घालुन त्याचे समुपदेशन करण्यात आले. पिडीत व्यक्तीला मा. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे समोर हजर करुन पिडीताचे मामा व लहान भाऊ यांचे स्वाधीन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी सायबर सेल टिमच्या कार्याची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या.

चंद्रपुर तसेच यवतमाळ जिल्हयात मोठया प्रमाणात कोळसा खाणी असुन यामध्ये अनेक प्रांतातील लोक नोकरी निमित्त चंद्रपुर शहरात राहत आहेत. अशाच एका परीवारातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यु नंतर त्याच्या मूलास वेस्टर्न कोलफील्ड लिमीटेड, भालर ता. वणी जि.यवतमाळ यांनी नोकरीवर सामावुन घेतले. परीवाराची आर्थीक परीस्थीती सुधारत असतांनाच यातील नोकरीवरील मुलाने आपल्या काही गरजा पूर्ण करण्याकरिता बल्लारपूर येथील एका व्यक्तीकडून काही रक्कम उधार घेतली होती. परंतु उधारीची रक्कम वेळेत देवु न शकल्याने उधार देणारी व्यक्ती ही पीडित व्यक्तीला धमकी देऊन डबल रक्कम मागत असल्याने तो मानसीक ओझ्याखाली आला व त्याने आत्महत्या निर्णय घेतला व तसा मेसेज आपल्या लहान भाऊ विनीत याला पाठवल्यामुळे तसेच सायबर सेलने तत्परता दाखवित केलेल्या कारवाईमुळे एका तरुणाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले ही बाब प्रशंसनिय आहे.

Post a Comment

0 Comments