गोडपिपरी तालुक्यातील चकलिखितवाडा रेतीघाटावरील गैरप्रकारांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा!समाजवादी पक्षाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी!

चंद्रपूर :- महाराष्ट्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी एकूण 21 रेती घाटांचा ठेक्यावर लिलाव करण्यात आला, त्यात गोडपिपरी नियमबाह्यरित्या रेती घाटावर या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरु आहे. चकलीखितवाड हा रेती घाट गोंडपिपरी तालुका मध्ये समाविष्ट आहे. या रेती घाटांवर पोकलैंड च्या माध्यमाने अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात या रेती घाटावरून शासन नियमांचे उल्लंघन करून उत्खनन होत असल्याने नदीचा प्रवाह व पाण्याचा प्रवाह बदलला आहे.या उत्खननामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. तसेच प्रसार माध्यम व सामाजवादी पार्टी चे तनशील पठान यांनी गोंडपिपरी तहसीलदारास लिखीत तक्रार केली असता त्यांनी कारवाई चे आश्वासन दिले परंतू अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यानंतर 11 एप्रिल 2022 रोजी घाटाच्या स्ट्रोकवर अपघात झाला, त्यात अमोल, रा. महाकाली कोलोरी चंद्रपूर या मजुराचा वाहनाने धडक दिल्याने घटनास्थळी मृत्यू झाला. गाड़ी क्रमांक TN 01 UA 8199 ही गाडी पोंभुर्णा पोलिस स्टेशनच्या ताब्यात असून रेती घाट किंवा त्या ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, तरी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून व उत्खनन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, या आशयाचे निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, जिल्हा परिवहन अध्यक्ष जावेद शेख, शहराध्यक्ष तनशील पठाण, शहर सरचिटणीस मोहिन शेख, युवक अध्यक्ष वसीम शेख, फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. त्वरित निवेदनावर कारवाई करण्यात न आल्यास घाट बंद न झाल्यास समाजवादी पक्ष कार्यकर्त्ता सह स्वत: घाट बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments