28 व 29 ला दोन दिवसीय खुली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-2022 चे आयोजन !




संपूर्ण भारतातून स्पर्धकांचा राहील सहभाग !

चंद्रपूर (का.प्रति.) : शनिवार दिनांक 28 व रविवार दि. 29 मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका पटांगण गांधी चौक चंद्रपूर येथे अठरावी राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले असून मागील 18 वर्षापासून सून खुल्या ज्युडो- कराटे स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर बॉक्सिंग स्पोर्ट्स अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केल्या जात असते. क्रीडा स्पर्धेत संपूर्ण भारतातून हजारोच्या संख्येने स्पर्धक हिस्सा घेत असतात. यावर्षी पहिल्यांदाच चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहयोगाने ही ज्युडो-कराटे स्पर्धा आमदार चषक स्पर्धा म्हणून आयोजित होणार आहे.
शनिवार २८ रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रधान आमदार विजय वडेट्टीवार हे लाभले असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा राज्यमंत्री सुनील केदार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बाळु भाऊ धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, राजुरा चे आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी नेते अशोक जीवतोडे, संतोष रावत, बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल व कुमारी शिवानी विजय वड्डेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे.
वार दिनांक 29 रोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण सोहळा च्या कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सोहळा प्रमुख आम. सुधीर मुनगंटीवार, वितरण सोहळा मार्गदर्शक आम. किशोर जोरगेवार यांची उपस्थिती राहणार आहे तर विशेष अतिथी म्हणून चिमूर चे आमदार बंटी भांगडिया मनपाचे आयुक्त राजेश मोहिते मनपाचे माजी उपमहापौर राहुल पावडे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, प्रदूषण विभागाचे अशोक करे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉक्टर अमोल पोद्दार, सेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, रायुकां जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयदीप रोडे यांची उपस्थिती राहणार आहे. या अठराव्या खुल्या राष्ट्रीय जुडो कराटे स्पर्धा-२०२२ जास्तीत जास्त नागरिकांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका पटांगण गांधी चौक चंद्रपूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा स्पोर्ट्स अकादमी चंद्रपूर वन पर्यावरण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचे सोमेश्वर येलचलवार, ज्योती माणूसमारे व मोनी आसवानी यांनी केले आहे, असे एका पत्रकान्वये ज्योती माणुसमारे यांनी कळविले आहे.
कुठे विरले "आत्मसंरक्षणाचे धडे" देण्याचे शासनाचे आवाहन ?

दिल्लीमध्ये निर्दयीपणे निर्भया बलात्कार झाल्यानंतर सरकारने शालेय विद्यार्थी व महिलांना आत्मसंरक्षणासाठी प्रत्येक शाळेमधून विद्यार्थीनींना लाठी-काठी, ज्युडो, कराटे यासारखे आत्मनिर्भर व आत्मविश्वास निर्माण करणारे प्रशिक्षण देण्यात येईल, असे ठामपणे जाहिर केले होते. तसे शासन निर्देश ही देण्यात आले होते. आजही राज्यात रोज हजारोंच्या संख्येने महिलांवर बलात्कार व अत्याचाराचे वृत्त वाचायला मिळते. शारिरीक शिक्षण देणारे क्लासेस ही आज विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही, एखादी बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर मोर्चे काढून त्याचा निषेध व्यक्त करण्यापुरती औपचारिकता कायम राहिली आहे. एका सर्व्हेक्षणानुसार अशा घटनांची ३०% घटनांची नोंदच पो. स्टे. मध्ये होते, बाकीच्या अत्याचार व बलात्काराच्या घटनांना वजनाने दाबल्या जातात. महिलांवरील अशा दुर्दैवी घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने "आत्मसंरक्षणाचे धडे" प्रत्येक शाळा, कॉलेजमधून द्यायला हवे. प्रत्येक शाळांमधून लाठी-काठी, ज्युडो, कराटे यासारखे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकाची कंत्राटी तत्वावर नियुक्ती व्हायला हवी व तशी मागणी ज्युडो-कराटे प्रशिक्षण देण्याऱ्या संघटनांनी करायला हवी. या संघटना अशा ठिकाणी गप्प कां? हा ही तेवढाचं संशोधनाचा विषय आहे. मुलींना नृत्यकला यायला हवी यासाठी आग्रही असणाऱ्या पालकवर्गांनीही आजची परिस्थिती व महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे बघुन आपली मानसिकता बदलायला हवी. चंद्रपुरात काही महिन्यापूर्वी एकतर्फी प्रेमातून महाकाली मंदिर जवळ वैष्णवी आंबटकर या मुलीची चाकुने खोपसून हत्या करण्यात आली. त्यानंतर मुलीच्या आईने प्रकरण घडण्यापुर्वी यांची तक्रार देण्यासाठी आपण पोलिसांत गेलो होतो. परंतू त्याला गांभीर्याने घेण्यात न आल्याने आपल्या कमवित्या मुलींची हत्या झाली होती असा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात दोषी शिपायाला निलंबित करून बाबुपेठ परिसरात नविन पोलिस चौकी बनविण्यात यावी, अशी डरकाळी फोडली होती, दोन्ही डरकाळ्या आज हवेत विरल्या आहेत. एखादी दू:खद घटना घडण्यापुर्वी ती घडुच नये यासाठी शासनाने व पालकांनी प्रयत्नशिल असावे, एवढेचं यानिमीत्ताने सांगावेसे वाटते. "आत्मसंरक्षणाचे धडे" देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हायला हवी व तशी जोरकस मागणीही व्हायला हवी.

Post a Comment

0 Comments