पोलिसांच्या तत्परतेने वाचले मुलीचे‌ प्राण !



पोलिसांच्या कर्तव्यदक्ष तेरा सलाम !

चंद्रपूर (वि. प्रति.)
पोलिस म्हटले की "विचार करणाऱ्यांच्या मनात" जशी असेल तशी डोळ्यासमोर एक वेगळी प्रतिमा निर्माण होते. परंतू कर्तव्यात प्रामाणिकता, वेळेचे भान व तत्परता यामुळे अनेक दुर्घटना, अपघात टळतात. अशा घटनांची व पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेची दखल फार कमी घेतली जाते. अशीच एक घटना काल चंद्रपूरात घडली. अशा तत्पर व कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम ! पोलिस विभागांमधील अशा मोजक्या प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळेचं पोलिसांवर नागरिकांचा आजही विश्वास कायम आहे.
काल सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील डायल 112 कक्ष येथे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई यांचेकडून कॉल प्राप्त झाला की चंद्रपूर येथील अंदाजे 21 वर्ष वय असलेली मुलगी हिने प्रेम प्रकरणातून ऑल आउट लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा माहितीवरून कॉल प्राप्त होताच पोलीस स्टेशन रामनगर येथील चार्ली ड्युटीवर हजर असलेले पोलीस अमलदार परवेश पठाण व मंगेश सायंकार यांना मोबाईल टॅब वर माहिती देऊन तात्काळ घटनास्थळावर पाठविण्यात आले त्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून कोणतेही वाहन उपलब्ध नसताना सदर पीडित मुलीला तात्काळ आपले दुचाकी वाहनावर बसून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले त्यामुळे सदर मुलीचे प्राण वाचले यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांनी प्रोत्साहनपर बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments