अचानक चौकातील जी. यू. शेंद्रे यांच्या दारू दुकानांचे मोजमाप करण्याची मागणी !
मंजुरी पेक्षा जास्त जागेत अतिरिक्त बांधकाम असल्यामुळे नागरिकांना सहन करावा लागत आहे त्रास !
चंद्रपूर (वि.प्रति.)
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर नूतनीकरण झालेल्या जुन्या दारू दुकानांच्या नुतनीकरण परवान्यांवर आता मोठ्या प्रमाणावर शंका निर्माण केल्या जात आहे. "जैसे थे" या तत्वावर दारू दूकानांचे परवाने नूतनीकरण करण्याचा शासन निर्णय होता परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने "आर्थिक देवाण-घेवाणी"तून शासनाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसविल्या चे चित्र आता समोर येऊ लागले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर शहरातील भरगच्च अशा अचानक चौकातील माता मंदिराजवळ जि. तु.शेद्रे (16/2021-22) यांचे जूने देशी दारूचे आहे. २०१५ ला दारूबंदी होण्यापूर्वी सदर दुकान हे जेवढ्या जागेत होते त्यापेक्षा आता ते वाढविण्यात आले असून दारुड्या साठी इथे दारू पिण्यासाठी मंजूरी न घेता परिसराच्या बाहेर एक शेड निर्माण केले असल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे या देशी दारू दुकानाच्या शेजारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ची शाखा, मोठी बाजारपेठ आहे. यासोबतच एका डॉक्टरांचे क्लिनिक सुद्धा तसेच गडचांदूर शहरातील मोठे दुर्गा माता मंदिर सुद्धा याच ठिकाणी आहे. या सर्व बाबींमुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दारुड्यांच्या उपद्व्याप्यामुळे या परिसरातील नागरिक, व्यापारी, सुज्ञ नागरिक, व महिला मंडळी, शाळकरी मुले-मुली त्रस्त झाले असून मध्यवर्ती बँकेमध्ये बचत गटाच्या येणाऱ्या महिलांना सुद्धा हे दारू दूकान व दारुड्यांच्या उपद्वापामूळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दारू दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकात पैश्याच्या वादातून ही झटापट ऐन रस्त्यावर झाल्याचे कळते. शेंद्रे यांच्या देशी दारू दुकानात सरकार मान्य दरापेक्षा जास्त दराने दारू विक्री केली जात असल्याने नेहमीच असले वाद कर्मचारी आणि ग्राहकांत होत असतात. सदर झटापट ही त्याच कारणामुळे झाल्याचे कळते. शासन नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दारूची विक्री व्हायला हवी. नुकतेच काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे जादा दराने दारूची विक्री होत असल्याच्याकारणाने परवानाधारकांवर शासन नियमाप्रमाणे दंड आकारण्यात आला होता. विश्वसनीय सूत्रानुसार ठरविलेल्या दरापेक्षा जास्त दराने परवानाधारकांनी दारूची विक्री केल्यास मोठा दंड आकारण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकार आहे. परंतु परवानाधारक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भ्रष्ट अधिकारी यांच्या मिलीभगत त्यामुळे जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडताना दिसत नाही. प्रत्येक दारू दुकानाच्या दर्शनी भागात दारूची विक्री कोणत्या दराने व्हायला हवी याचे दर पत्रक दर्शनी भागात लागायला हवे. तसेच तक्रार त्यांचेकडे करायची आहे त्यांचे नांव, मुद्दा कार्यालयीन पत्ता, मोबाईल क्रमांक हे लावायलाच हवे. त्यामुळे परवानाधारक जादा दराने विक्री करून ग्राहकांची होत असलेली लूट थांबेल व जादा दराने विक्री करणाऱ्या परवाना धारकांवर वचक सुद्धा राहील, त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी ही मागणी अवश्य जोर लावून धरायला हवी.
मागील काही दिवसांपासून या ठिकाणी येणाऱ्या दारुड्यांना परिसरात देत असल्याचा सोशल मिडीयाला video मोठ्या प्रमाणात viral होत आहे. "खाऊन-पेऊन मस्त झालेले" राजुरा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व अन्य कर्मचारी जाणिवपूर्वक या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या परिसरात नेहमीचं तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बि. के. शेंद्रे यांच्या देशी दारू दूकानाची प्रत्यक्ष मोजणी करून व त्यांनी विभागाला सादर केलेली कागदपत्रे यांची वरिष्ठ स्तरावर तपासणी करून परवाना धारकांवर दंडात्मक कारवाई करून सदर देशी दारू दूकान अन्यत्र हलविण्यात यावे तसेच नागरिकांना होणारा त्रास बघता, गडचांदूर नगरपरिषद ने यासाठी विशेष सभा घेऊन हे दुकान अन्यत्र हलविण्याची च्ण्ठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. सदर दुकानांच्या परवानगीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची सद्यस्थितीत असलेल्या दुकानाच्या जागेची प्रत्यक्ष मोजमाप करावे अशी मागणी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? गडचांदूर पोलिसांनी उपद्व्याप करणाऱ्या दारुड्यांवर कारवाई करावी!
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या व गटांमूळे महिला बचतगटांच्च्या महिलांचे याठिकाणी मोठ्या प्रमाणात येणे-जाणे असते, तसेच शाळकरी मुलींची ये-जा असलेल्या शेंद्रे यांच्या दारू दुकान पाशी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण राहिल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गडचांदूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सत्यजित आमले शांत व सुव्यवस्थेच्या विचार करून परवाना धारक बि.के. शेंद्रे यांना समज द्यावी, उपद्व्याप माजविणाऱ्या दारुड्यांवर काही अनुचित प्रकार घडण्पूयार्वी योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा गडचांदूरवासियांची आहे.
देशी दारू दुकाने शहराबाहेर हटविण्याची विविध संघटनाच्या मागणी चे भिजत घोंगडे !
मागील काही महिन्यापूर्वी गडचांदूर शहरातील सर्व देशी दारूची दुकाने शहराच्या बाहेर हलविण्यात यावे अशी मागणी पत्रकार संघ व विविध संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला करण्यात आली होती परंतु त्यानंतर या मागणीचे घोंगडे मात्र भिजत राहिले. गडचांदूरातील काही राजकारण्यांचे दारू दुकानदारांशी आर्थिक व्यवहार असल्यामुळे ती मागणी म्हणजे "भिजते घोंगडे" ठरली आहे.
0 टिप्पण्या