Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

महाराष्ट्र दिनाचे औचित्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी- कर्मचारी यांचा सम्मान चिन्ह देऊन सत्कार !  • तसेच भद्रावती मर्डर केसमधील तपास पथकाला प्रशस्तीपत्र प्रदान!

चंद्रपूर : महाराष्ट्र दिनाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ०१ मे २०२२ रोजी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील आयोजीत मुख्य ध्वजारोहण समारंभात मा. ना. श्री. विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा यांचे शुभ हस्ते पोलीस दलात उल्लेखनिय कामगीरी केल्याबाबत व चंद्रपुर पोलीस दलात १५ वर्ष सतत उल्लेखनिय कामगीरी केल्याबाबत ०४ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे सम्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यात १) श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर, २) श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर, ३) पोहवा. श्री. अशोक गोडे, नक्षल सेल चंद्रपुर, ४) पोहवा श्री. किसन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचा समावेश आहे.

तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपुर येथे संपन्न झालेले ध्वजारोहन कार्यक्रमात मा. अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे हस्ते पोलीस स्टेशन भद्रावती येथील संपुर्ण राज्यात बहुचर्चीत महीला खुन प्रकरणाचा यशस्वीरीत्या छडा लावुन मृतक महीलेचा शोध घेवुन तांत्रिक तपासाचे आधारे सायबर सेल चंद्रपुर येथील पोलीस अंमलदार पोहवा / मुजावर अली, पोना/संतोष पानघाटे, पोअं/भास्कर चिचवलकर, पोअं/ उमेश रोडे, पोअं/वैभव पत्तीवार, पोअं/राहुल पोंदे यांनी अति परीश्रमाने तपास पुर्ण केला तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि संदीप कापडे, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउनि अतुल कावडे तसेच सफौ/ राजेंद्र खनके, पोहवा / संजय आतकुलवार, पोअं/सतीश बघमारे, पोअं/गोपाल आतकुलवार, पोअं/प्रशांत नागोसे, पोना/अनुप डांगे, पोना/मिलींद जांभुळे, पोअं/गणेश भोयर, पोअं/संदीप मुळे यांनी विधीसंघर्ष महीला आरोपी व तिचा साथीदार पुरुष आरोपी असे दोन्ही आरोपींना निष्पन्न व अटक करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. करीता नमुद तपास पथकातील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments