अमलनाला परिसरात आढळली मृत जनावरांची चौकशी व्हावी ! Gadchandur city 'hub' of cow-trafficking?





गौ-तस्करीचे मोठे रॅकेट गडचांदूरात सक्रीय असल्याचा नागरिकांचा विश्वास !
अंमलनाला सौदर्यीकरणाला भविष्यात धोका होण्याची शक्यता !


चंद्रपूर (वि.प्रति.) : औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर शहर येथील अंमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात मृत जनावरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत जनावरे कोणी टाकली व का टाकली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.


सौंदर्यीकरण सूरू असलेल्या अंमलनाला परिसरात एका गोंतस्कराचे गोडाऊन असल्याचे सांगण्यात येते. या गो तस्करा जवळ पॅकबंद असलेल्या मोठ्या चारचाकी गाड्या ने तेलंगणा मध्ये गो तस्करी होत असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे. यापूर्वी चंद्रपूरचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गो तस्करांवर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर गो तस्करांनी आपला मार्ग बदलला या मार्गामध्ये आता गडचांदूर हे मुख्य केंद्र असल्याचे सांगण्यात येते. पोलिस विभागाने वरिष्ठ स्तरावर यांची चौकशी करून मोठ्या प्रमाणात आढळलेल्या मृत जनावरांची अवश्य चौकशी करावी.

तेलंगणामध्ये गो तस्करी करताना जनावरे मृत झाल्यास ते अंमलनाला धरणात सोडले जाते असे पण सांगण्यात येत आहे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गडचांदूरकर आता करू लागले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून केव्हाही पावसाची शक्यता आहे. अशावेळी ते मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमल नाला चे पाणी गडचांदूर आणि नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते अशा स्थितीत मृत जनावरे आढळल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळून आले असताना त्याकडे कोणत्याच विभागाचे लक्ष गेले नसेल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मृत जनावरे कशानी मृत पावली याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.


या आधी ही असल्याच प्रकारे मृत गोवंश हे इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली गेली होते. स्थानिकांनी विरोध केल्यावर आता मृत जनावरे ही बैलमपुर शिवारात टाकण्यात आल्याचे कळते. गडचांदूर हे आंतरराज्यिय गोवंश तस्करीचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले असून वाहतूकी दरम्यान मरण पावलेली जनावरे निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याचे लोकांचे मत आहे. पोलिसांनी याची योग्य ती चौकशी करावी व या प्रकरणाचा धडा लावावा अशी मागणी होत आहे.

गडचांदूर शहरात सुरु असलेल्या गौ-तस्करीसंदर्भात चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना पुराव्यानिशी पत्रकार संघाच्या माध्यमातून तक्रारी देण्यात येणार असून गडचांदूर ला सुरू असलेली गौ- तस्करी करणारे अटकेत आल्यास त्यांच्यावर ताबा मिळाल्यास आंतर राज्य स्तरावर होणाऱ्या गो तस्करीचा पर्दाफाश होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. गडचांदूर शहरात मागील दोन वर्षापासून हा धंदा सुरू असून काही दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गो तस्करांवर केलेल्या कारवाईनंतर गो-तस्करांनी आता काम करण्याची पद्धत व रस्त्यांची अदलाबदल केली आहे त्यात गडचांदूर हे मुख्य स्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. 


साप्ता. विदर्भ आठवडी चा  दर मंगळवारी निघणारा आता नियमित वाचा






Post a Comment

0 Comments