रेती तस्करांकडून वसुलीसाठी पोलिसांचे विशेष वसुली पथक गठीत? #police chandrapur



शहर पो. स्टे. चे सुरेश मडावी, सचिन राठोड यांचेकडे रेती तस्करांकडून वसुलीचा कारभार ?

चंद्रपूर (वि.प्रति.)

रेती तस्करीवर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाने २८ जानेवारी २०२२ रोजी वाळू/रेती निगृती सुधारित धोरणानुसार काही नियमावली जाहिर केली यात जिल्हास्तरावर पोलिस विभागाला गौण खनिजाच्या अवैध उत्खनन/वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी तहसिल, उपविभाग, परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी व महसुल अधिकारी आदि कर्मचाऱ्यांचे दक्षता पथके अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी निर्माण करावी, सदर पथकांनी अवैध रेती तस्करीवर आळा बसविण्यासाठी सामूहिकपणे कार्य करावे असे उल्लेखित आहे. परंतु याच नियमाचा पोलिस विभागाकडून 'अर्थ'पूर्ण लाभ उचलला जात असल्याचे दिसत आहे.

रेती तस्करांकडून वसुलीसाठी पोलिसांनी स्वतःचे एक विशेष वसुली पथक बनविले असुन चंद्रपूर शहर मनपा हद्दीच्या बाहेरील नदीनाल्यामधून होत असलेल्या रेती तस्करांची यादी बनवुन त्यांचेकडून या वसुली पथकाकडून धन वसुली केल्या जात असल्याचे नुकतेच चित्र आहे. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरेश मडावी, सचिन राठोड या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविल्या गेली असल्याची माहिती आहे. नुकतेच व्हायरल झालेल्या एका ऑडीओ क्लिप मध्ये नदीच्या धडावरील रेती जमा करून त्यांचा व्यवसाय करणाऱ्या रेती तस्कराला या वसुली बहाद्दरांनी 'तुम्ही अजुन जुने पैसे दिले नाही, आता तुमचे रेती चे ट्रॅक्टर कसे चालतात. पुर्वी जुनी वसुली द्या. पोलिस स्टेशनला भेटा.' अशा शब्दात खडसावणी देत असल्याचा हा ऑडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुरेश मडावी व सचिव राठोड यांना शहर पोलिसांनी अशी वसुली करण्याची परवानगी दिली असल्याचे कळते. सुरेश मडावी व सचिन राठोड कुणाच्या आदेशाने ही वसुली करीत आहे. याची चौकशी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी करायला हवी. चंद्रपूर शहराच्या रेती घाट नसलेल्या व नदीनाल्यांमधून आज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रोज हजारो ब्रास रेती रेती तस्करांकडून अवैधरित्या उपसा होत आहे. यामध्ये नदीचे पात्र, नदीचा दिशा बदलली जात आहे. पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यातून शासनाला कोणताच महसूल मिळत नसून नदी-नाल्यातील रेती आमच्या बापाची या धोरणाने काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्कर रेती चा मनमानी उपसा करीत आहे. तर पोलीस त्यावर कारवाई करण्याचे सोडून त्यांचीच यादी बनवून त्यांचेकडून आपली "मासिक" आवक जमा करीत आहे.  यासाठी दिलेल्या विशेष अधिकारांचा 'वसुली पथक' बनवून पैसा कमाविण्याचा धंदा पोलिसांकडून चालविला जात असले तर तो कोणाच्या निर्देश/आदेशानुसार सुरू आहे. याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हायला हवी. वाळु उत्खनन करणे म्हणजे वाणिज्यीक किंवा महसुल मिळविणे हा उद्देश नसुन विकास कामासाठी वाळु उपलब्ध व्हावी या प्रमुख उद्देश आहे. त्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला पोलिस विभाग स्वतःचं वसुली पथक बनवून वसुली करीत असेल तर 'कुंपनचं शेत खाताय' असा प्रकार पोलिस विभागामध्ये सुरू आहे, सुरेश मडावी व सचिन राठोड यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यापुर्वी ही सुरेश मडावी वसुलीच्या कारणाने चर्चेत राहिले आहे, हे महत्वाचे !


असे हि घडते ! ऐकावे ते नवलच !

‘सदरक्षणाय खलनिग्रहाय' हे पोलिसांचे ब्रिद आहे. या ब्रिदाला काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी तिलांजली वाहिली असून पो. स्टे. मध्ये कारवाई कमी आणि ‘सेटिंग' जास्त होते असे बघायला मिळते. नैतिकता गहाण ठेवलेले काही तथाकथित सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार या सेटिंग मध्ये नेहमी अग्रेसर असतात. दोन महिन्यापूर्वी शहरामध्ये वेकोली मध्ये नौकरी करणारा एक व्यक्ती निवृत्तीनंतर मरण पावला. त्याचा व्यसनाधिन असलेला एकलुता एक मुलगा राजा याच्या बँक खात्यात वडीलांचे निवृत्तीनंतरची रक्कम जमा झाली. व्यसनाधिन असलेल्या राजाने व्यसनाधिनतेच्या आहारी जाऊन आपल्या एका मित्राला आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे सांगीतले. त्याचा धुर्त मित्राने दारू पाजुन राजा च्या बँक खात्यातील रक्कम त्याचाच मोबाईल घेऊन त्याच्या खात्यातील रक्कम स्वतःसोबत अन्य काही लोकांच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफार्म केली. दुसऱ्या दिवशी दारूच्या नशेची झिंगाट उतरल्यानंतर आपल्या खात्यातुन तिन ते साडे तिन लाखाची रक्कम पळविण्यात आल्याचे राजाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस स्टेशन गाठले. त्याठिकाणी त्यांनी परिचयाच्या असलेल्या एका पोलिसांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरण ऐकुन घेतल्यानंतर तक्रार करून सायबर मध्ये सदर प्रकरण जायला हवे होते, परंतु तसे काहीचं झाले नाही. ज्यांचेकडे राजाने विश्वासाने प्रकरण सांगीतले. त्यांनी राजाला बाजुच्या रूममध्ये घेऊन बेदम मारहाण (फिर्यादीला) केली. त्याचा मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतला आणि पोलिस स्टेशनमधील त्रिकुटाने ज्यांच्या-ज्यांच्या बँक खात्यात रक्कमा टाकण्यात आल्या होत्या. त्यांना फोन करून पो. स्टे. ला बोलाविले. जेवढे मिळतील तेवढ्या रक्कमा परत मिळविल्या काही स्वतः ठेवल्या काही परत केल्या. आज ही राजा पोलिसांच्या भितीने लपत फिरत आहे. ना कर्तव्याची जाण नां ! ना कायद्याची भिती ! या प्रकरणातील त्रिकुटाची व सायबर गुन्ह्याची चौकशी व्हायला हवी. 'कुंपन शेत खाते' म्हणतात ते यालाच !

Post a Comment

0 Comments