‘चला जाणू या नदीला’ उपक्रमातंर्गत 35 गावाचे गावकरी उमा नदी पात्रात !
चंद्रपूर (का.प्र.) : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिमूर तालुक्यातील 20 गावे तसेच सिंदेवाही तालुक्यातील 15 गावे असे एकूण 35 गावातील नागरिकांनी उमा नदी पात्रात उतरून नदीमध्ये दीप प्रज्वलन केले आणि एकतेचा संदेश दिला.
रेतीचा व्यवसाय ' हपापा' चा माल 'गपापा' !
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदिला’अभियानाच्या माध्यमातून चिमुर व सिंदेवाही तालुक्यात उमा नदी संवाद यात्रेच्या जनजागृती करण्याकरीता जिल्हा प्रशासन व प्रभु फॉऊंडेशन, चंद्रपूर तसेच नदी काठावरील गावे यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उमा नदीच्या जल पुजनाच्या कार्यक्रमाचे विविध गावांमध्ये आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उमा नदी प्रहरी सदस्य तसेच मनरेगा विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी अजय काकडे यांनी मार्गदर्शन करून शासनाचे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व गावक-यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला ‘मी पाणी कारभारी’ टीम तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, महिला बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ, भजन मंडळ ,युवक मंडळ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments