वणी कोळसा चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना ! Instructions to file a criminal case in the case of Vani coal theft!ट्रक चे चालक-मालक आणि संबंधित खाण व्यवस्थापकांविरोधात विरोधात होणार गुन्हा दाखल !

यवतमाळ (प्रति.)

११ जानेवारी रोजी वणी तालुक्यात असलेल्या पेटूर परिसरात गस्तीवर असलेल्या वणी पोलिसांनी विना परवाना कोळश्याची वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकवर कारवाई केली होती. अवैध कोळसा भरून जाणारे आठ ट्रकवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून हा कोळसा आला कुठून, जाणारे कुठे होता ? ज्या चार चाकी वाहनांमध्ये परवाना आहे काय ? कोळसा वाहतुक करण्याची टीपी आहे काय ? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर कोळश्याचा मोठा घोटाळा उडकीस आला. २०० लाखांच्या जवळपास कोळश्याची चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर नागपूरचे कोळसा व्यापारी यात सामिल असल्याचे सिद्ध झाले. यानंतर यवतमाळ चे खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक यांनी पुनवट रोड वरील इंडो युनिक कोल वॉशरीज मधुन हा कोळसा पुरवठा करण्यात येत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर इंडो युनिक कोल वॉशरीज ला त्वरित सिल करण्यात आले होते. कार्यतत्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या कोळसा चोरी प्रकरणात अधिक चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. खनिकर्म विभागाने या कोळसा चोरी प्रकरणात या ट्रकमधील कोळसा मे. बी. इस्पात लि. ने रूईकोट मुकूटबन येथील कोळसा खाणीमधुन उचलल्याचे स्पष्ट झाले. हा कोळशा सुमारे २५७ टन वजनाचा असुन त्याची अंदाजे किंमत २०.५६ लाख रूपये असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात न्यायालयाकडून तपासाची परवानगी घेण्यात आल्याचे ही या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. या प्राथमिक अहवालावरून यवतमाळ जिल्हा खनिकर्म विभागाने बी. इस्पात च्या खाण व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीने १९ जानेवारी रोजी खुलासा सादर केला. मात्र हा खुलासा सुसंगत नसल्याचे सांगून खाण विभागाने तो अमान्य केला व वाहतुक पावतीविना आठ ट्रकमधून कोळशाची वाहतुक केल्याप्रकरणी पाच लाख ३९ हजार २८५ रूपयांचा दंड खाण अधिकाऱ्यांनी इस्पात या खाण कंपनीला ठोठावला व हा दंड तिन दिवसात भरण्याचे आदेश दिले आहे. सोबत वाहतुक पावतीविना कोळसा वाहतुक केल्यामुळे ट्रकचे मालक-चालक, आणि इस्पात खाण व्यवस्थापकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे पत्र वणी पोलिसांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कोळसा प्रकरणातील मुख्य आरोपींविरोधात अद्यापपावेतो कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे कळते. परंतु पोलिसांच्या रडारवर नागपूरचे तिन कोळसा तस्कर असुन या कोळसा तस्करांचे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा चोरीसोबत घनिष्ठ संबंध असल्याचे माहिती आहे. वणी पोलिसांच्या या प्रशंसनिय कार्यामुळे कोळसा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.


वणी येथील कोळसा तस्करी प्रकरणातील ट्रकचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा 

आणि वाहतुक कर भरला नसल्याचे उघड !

https://www.vidarbhaathawadi.in/2023/01/blog-post.html

पुनवट जवळील इंडो युनिक कोल वॉशरीज की कोल डेपो ? 
Indo Unique Coal Washies or Coal Depot near Punwat ?

 

३१ मार्च २०२० रोजी पुनवट जवळील इंडो युनिक कोल ही वॉशरीज म्हणुन या कोल वॉशरीज ला परवानगी देण्यात आली होती. परंतु या कोळसा साठवणुकीचे कार्य सुरू होते. कोल वॉशरीज मालकाने याचे कोल- डेपो मध्ये परावर्तीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे. चालु महिन्यामध्ये या कोल डेपो ला परवानगी देण्यात येणार होती. तत्पुर्वीच वणी पोलिसांच्या तत्परतेमुळे या इंडो युनिक कोल चा भंडाफोड झाला. याठिकाणाहुन कोळसा साठवुन तो विक्री करण्यात येत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे यवतमाळच्या खनिकर्म विभागाने याला सिल ठोकले. ही कोल-वॉशरीज ज्यांच्या नावाने आहे ते नागपूर येथे वास्तव्यास असुन राष्ट्रीय संपत्ती कोळश्याची अवैध तस्करीत या कोळसा तस्करांच्या जाळ्याचा वणी पोलिसांनी पर्दाफाश करायला हवा.

Post a Comment

0 Comments