वणी येथील कोळसा चोरीत चंद्रपूर चे ट्रक ! Trucks of Chandrapur stealing coal from Vani!



कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ !

नागपूरचे तिन कोळसा व्यापारी रडारवर ! 

चंद्रपूर (वि. प्रति . )

वणी येथे मागील आठवड्यात आठ कोळश्याने भरलेले ट्रक मुकूटबन रोडवर पोलिसांनी पकडले. पुनवट जवळील एका कोल - वॉशरीजमधुन हे ट्रक वणी येथील बीएस स्टील कंपनी येथे जात असतांना पकडण्यात त्यावेळी या कोळसा भरलेल्या ट्रक चालकांकडे कोणतेही वैध कागदपत्रे नव्हती. वणी येथील बीएस स्टील कंपनी रॉयल्टी, वस्तू व सेवा कर आणि पर्यावरण सेससह कोट्यावधी रूपयांचा कोळसा व कर चोरी करीत आहे. या माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोळश्याने भरलेले हे आठ ट्रक पकडण्यात आले होते. त्याचे धागेदोरे हे नागपूर येथील कोळसा व्यापाऱ्यांशी जुळलेले असुन अग्रवाल सह त्या तिन ही व्यापाऱ्यांच्या व व बीएस स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची होत असल्याने कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वणी येथे पकडलेल्या या कोळसा चोरीच्या ट्रकमधून महिन्याला अंदाजे ६० हजार टन कोळशाची कर न भरता वाहतुक करीत होती. हा प्रकार दोन ते अडीच वर्षापासून सुरू असल्याने १०० ते १५० कोटीपेक्षा अधिक शासनाच्या महसुलाची चोरी झाली असल्याचे कळते. सदर प्रकरणात एका कोल वॉशरीज ला सील करण्यात आल्याची माहिती आहे. वणी पोलिसांची  हि सगळ्यात मोठी कारवाई आहे.  महत्वाचे म्हणजे पकडण्यात आलेल्या या कोळशाने भरलेल्या ट्रक ड्रायव्हरांकडे कोणतीही वैध कागदपत्रे व ट्रान्झिट पास नव्हती. मागील आठ दिवसांपासुन हे लोटेड ट्रक सोडविण्यासाठी कुणीही समोर आलेला नसुन चंद्रपूर व नागपूर येथील ट्रान्सपोर्ट मालकांचे हे ट्रक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुन्हा वाचा...  राष्ट्रीय संपत्ती कोळसा : लुटा आणि खा !

https://www.vidarbhaathawadi.in/2021/04/coal-thief.html

यापुर्वी ही वणी येथील कोळशा चोरीमध्ये चंद्रपूर च्या ट्रान्सपोर्ट मालकांवर झाली होती कारवाई !

Before this, action was taken against the transport owners of Chandrapur in coal theft in Vani!

यापुर्वी ही वणी पोलिसांनी कोळश्याने भरलेले ट्रक पकडले होते. यावेळी चंद्रपूर येथील पत्रकारांनी तक्रार व पाठपुरावा केल्यानंतर चंद्रपूरच्या एका ट्रान्सपोर्ट मालकाला फरार होता त्यानंतर त्याला कोर्टातुन जामिन घ्यावा लागला होता, हे विशेष ! चंद्रपूर येथे ही कोळश्याची तस्करी करणाऱ्यांची साखळी असुन त्याचा ही शोध यानिमीत्ताने वणी पोलिसांनी घेतल्यास मोठा रॅकेट चा पर्दाफाश होऊ शकतो. कोल वॉशरीजमधुन होणारा कोळश्याचा घोळ हिवाळी अधिवेशनामध्ये ही चर्चेला आला होता. राष्ट्रीय संपत्ती शासनाचा कर बुडवून होणारी लुट यावर योग्य कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. यापुर्वी चंद्रपूरातही अनेकदा कोळशाचे ट्रक पकडले गेले आहे. त्यावर ठोस कारवाई करण्यात येत नसल्यामुळे कोळशा तस्करांचे फावत असल्याचे दिसते.

Earlier this Vani police had caught trucks full of coal. This time, a transport owner of Chandrapur was absconding after a complaint and follow-up by journalists from Chandrapur, after which he had to get bail from the court, this is special! It is a chain of coal smugglers in Chandrapur and if Vani police investigates it, a big racket can be exposed. The coal mess from coal washeries was discussed in the winter session. It seems that proper action is not being taken against the tax evasion of the National Wealth Management. Coal trucks have been caught many times in Chandrapur before this. Since concrete action is not being taken on it, coal smugglers seem to be in the grip of it.

Post a Comment

0 Comments