पार्थशर समाचार चे यशस्वी आयोजन!
चंद्रपूर : भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व दे. गो. तुकुम प्रभाग क्रमांक १ चे नगर सेवक इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांना त्यांचा कामाची व अथक परिश्रमाची पोच पावती "चंद्रपूररत्न" पुरस्कार च्या स्वरूपात देऊन राजेश नायडू संचालित पार्थशर समाचार या डिजिटल व्हिडिओ न्यूज चॅनल द्वारा आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पार्थशर समाचार द्वारा मागील दोन वर्षांपासून आपल्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करित आहे. दोन वर्षांच्या यशस्वितेनंतर पार्थशर समाचार ने तिसऱ्या वर्षांत पदार्पणानिमीत्त मंगळवार दि. १२ मार्च रोजी चं.जि. मध्य. सह. बॅंकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रपूर चे आम. किशोरभाऊ जोरगेवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक अशोकभाऊ जीवतोडे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर प्रेस क्लब चे अध्यक्ष व नवभारत चे जिल्हा प्रतिनिधी श्री संजय तायडे, सर्च चे संचालक इंजि. दिलीप झाडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विभिन्न क्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरुष, महिला, बालक असे पुरस्कार देण्यात आले.
सन्मान कर्तृत्वाचं....! (Honorable achievement...!)
उत्कृष्ठ नगरसेवक म्हणून चंद्रपूररत्न हा पुरस्कार इंजि. सुभाष कासनगोट्टूवार eng. Subhash Kasngottuwar याना मिळाला. नगरसेवक या गटात एक मात्र पुरस्कार सुभाष कासनगोट्टूवार यांना देण्यात आला. आपल्या प्रभागात यांनी विविध उत्कृष्ट कामे केलीत. त्यामध्ये कुंदन प्लाझा हॉटेल ते लॉ कॉलेज रिंग रोड रद्द करण्यासाठी त्यांनी नागरिकांसह मोठे आंदोलन चालवले आणि शेवटी तो प्रस्ताव मंत्रालयातून रद्द करून शेकडो लोकांचे घर वाचवले, तसेच आपल्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव कमविले. आपल्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात तीस लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळविले. नुकतेच चंद्रपूर महानगरपालिका द्वारा आयोजित स्वच्छता लिग स्पर्धेमध्ये ५१ हजार रु. नगदी व दहा लाख रुपये विकास कार्यकरीता बक्षीस जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, लोकप्रिय आमदार किशोर्भाऊ जोरगेवार यांचे हस्ते देण्यात आले. योगासाठी महिलांना व वृद्ध नागरिकांना सुख-सुविधा उपलब्ध करून दिली, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सांस्कृतिक सभागृह बांधकाम, प्रभागामध्ये १९ गार्डन बांधण्यात आले, श्री स्वामी समर्थ सभागृह, श्री माताजी निर्मला देवी अभ्यासिका व चैतन्य जेष्ठ नागरिक संघाचे सभागृह बांधकामा साठी निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे गरीब नागरिकांसाठी आरोग्य हेल्थ कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, रेशन कार्ड, श्रमिक कार्ड, आधार कार्ड , आयुष्मान भारत कार्ड, मतदार नोंदणी, मोफत डोळे तपासणी शिबिर, चष्मे वाटप व १११ रुग्णांचे मोतीया बिंदूचे ऑपरेशन असे अनेक समाजोपयोगी कार्ये त्यांनी केली आहेत. नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेपासून प्रेरणा घेऊन व भाऊंना दैवत माणणारे इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांची कार्यशैलीमुळे ते समाजकारण करणारे समाजसेवक म्हणून जिल्ह्यात प्रचलित झाले आहे. त्यांच्या कार्यालयात रोज येणारे शेकडो लोकांचे लहान-मोठ्या समस्या ते यशस्वीरित्या पार पाळतात. सुधीरभाऊंच्या कार्यशैलीपासून प्रेरित होऊन सुभाषभाऊंच्या कार्यालयात भरणारा जनता दरबार त्यांची वेगळी ओळख निर्माण करणारा आहे. स्वतः अभियंता असलेले कासनगोट्टूवार आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून गेले होते. त्यांची कार्यशैली आजही तशीच असल्यामुळे त्यांच्या घरी असलेल्या कार्यालयात समस्या-निवेदने घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. त्यांना मिळालेला उत्कृष्ट नगरसेवक हा चंद्रपूर रत्न पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती सांगणारा आहे.
0 Comments