जनता विद्यालय गोंडपिपरी येथे संगीतमय योग कार्यशाळा संपन्न ! Musical Yoga Workshop completed at Janata Vidyalaya Gondpipari!



परिवर्तन योगा परिवार ने केले होते आयोजन !

गोंडपिपरी : परिवर्तन योगा परिवार चंद्रपूरच्या वतीने 5 मार्च रविवारला गोंडपिपरी येथे संगीतमय योगा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या योग कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून परिवर्तन योगा परिवार चे अध्यक्ष अनिल फाले सर उपस्थित होते. तसेच परिवर्तन योगा परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक सचिव शशिकांत मस्के प्रामुख्याने उपस्थित होते. उपाध्यक्ष सलीमभाई चारणीया, कोषाध्यक्ष नानाभाऊ गरमडे, प्रशिक्षक संजय गरमडे, प्रमोदजी नागरकर प्रशिक्षिका पोर्णिमा चांदेकर, कल्पना जांगिलवार, मनीषा लोखंडे यांची उपस्थिती होती तर गोंडपिपरीचे राजूभाऊ चंदेल हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. महिलांना सुदृढ आरोग्य व स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करण्यासाठी गोंडपिपरी येथे लाभलेल्या मुख्य योग शिक्षिका शुशिलाताई नांदेडकर यांनी योगा सोबतच महिला सक्षमीकरण आणि एकत्रिकरण ही काळाची गरज आहे हे पटवून दिलं. नसीम चारणीया मँडम यांनी आपल्या मनोगतामधून महिलांमधला उत्साह कसा वाढविता येईल, दैनंदिन जीवनात महिलांच्या आरोग्य विषयक समस्या कशा नष्ट करता येईल यांच महत्त्व थोडक्यात समजावून सांगितलं तर प्रमुख मार्गदर्शक शशिकांत मस्के सर यांनी संगीतमय योग केल्याने फक्त शरीर निरोगी राहत नाही तर, संगीतमय योगामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो.निरोगी जीवन जगण्यासाठी जीवनात संगीतमय योगा अत्यंत महत्त्वाचा आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं.रोज सकाळी पाच ला सुरू होणाऱ्या या  संगीतमय योगा क्लास ला सर्व पाहुण्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि योग प्रशिक्षणाचे धडे देऊन त्याचे महत्त्व उत्तम पध्दतीने पटवून दिले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिका, कवयित्री सौ.संगीता बांबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता मुंगले यांनी केले.

Post a Comment

0 Comments