पाटबंधारे विभाग, चंद्रपूर व प्रभु फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रम!
चंद्रपूर : गुरूवार १६ मार्च २०२३ रोजी पाटबंधारे विभाग चंद्रपूर व प्रभु फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्था व सहभागी सिंचन व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
त्या कार्यक्रमास शा.बा. काळे कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर तसेच पाटबंधारे उपविभागीय अभियंता मुल सिंग साहेब तसेच घोडाझरी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मदनकर साहेब व इतर सहकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुरुगानंथम साहेब व आदिवासी विभागातील नियोजन अधिकारी नंदनवार साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पावरील स्थापन पाणी वापर संस्थांना संचालक मंडळ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसप्ताह दिना निमित्त पाणी नियोजन व व्यवस्थापन या वर कार्यक्रमाचे अध्यक्ष काळे साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. मुरुगानंथम साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
0 टिप्पण्या