गोविंददेव गिरी महाराज यांनी शब्दसुमनांनी केला मुनगंटीवार यांचा गौरव !
काष्ठ शोभायात्रेमुळे चंद्रपूर जिल्हा श्रीराममय जाहला !
चंद्रपूर (वि. प्रति. )
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील उच्च दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी बुधवार दि. २९ मार्च रोजी रवाना झाली. बल्लारपूर येथून भव्य अशा शोभायात्रा काढून भक्तीमय वातावरणात हे सागवान काष्ठ अयोध्येकडे रवाना करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज यांनी यावेळी सुधीरभाऊंमध्ये दिखावा नाही. ते प्रत्येक कार्य अंतःकरणातुन करीत असतात. त्यांच्या भाषणामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असुन राजनेत्यांमध्ये कधी-कधी अनेक गोष्टी फक्त दिखाव्यासाठी असतात, त्याला सुधीरभाऊ अपवाद आहेत, या शब्दसुमनांनी गोविंददेव गिरी महाराज हे उपस्थितांसमोर संबोधितांना म्हणाले. सुधीरभाऊंचा हा गुणगौरव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. अयोध्या येथे स्थापित होत असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी देशातील अनेक ठिकाणाहुन काष्ठ येत असुन चंद्रपूर जिल्ह्यातील हे वनमंत्री मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिलेले हे काष्ठ अमुल असल्याचे ही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या काष्ठपूजन सोहळ्याला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. योगेंद्र उपाध्याय, स्टॅम्प न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल वन, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ अरुणकुमारजी सक्सेना, अभिनेते अरुण गोवील, सुनील लहरी, अभिनेत्री दिपीका चिखलिया या सोहळ्याला उपस्थित होते. यासोबतचं संपूर्ण महाराष्ट्रामधुन जवळपास दोन हजार कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. व मोठ्या प्रमाणात बल्लारपुर एफडीसीएम पासुन ते चंद्रपूर शहरात गुरूवार ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या एक दिवसांपुर्वी निघालेल्या या शोभायात्रेमुळे चंद्रपूर शहर श्रीराममय झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. The teak wood found in Chandrapur district is the best in the country. या सागवान काष्ठाचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज होती. ती गरज चंद्रपूर जिल्ह्यातील अति मौल्यवान सागवान काष्ठाच्या रूपाने पुर्ण झाली असुन या ऐतिहासिक क्षणाचा चंद्रपूर जिल्हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ग्वाही ठरला अशी भावना चंद्रपूरकरांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या