उपाययोजना करण्याची प्रवाश्यांची मागणी !
चंद्रपूर ( का . प्रति . )
चंद्रपूर येथील नविन बस स्टँड जवळपास पुर्णत्वास आलेले आहे. या बस स्टँड वर आता भुरट्या चोरांचा हैदोस पसरला असुन कुणाचे मोबाईल, कुणाचे पॅकेट-दागिणे लंपास करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असुन यामुळे प्रवाशांना नुकसानीसोबत मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठे व नाविण्यपुर्ण बस स्टँन्ड बांधुन प्रवाशांना होणाऱ्या मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. चंद्रपूर आगार प्रमुखांनी या भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिस चौकी ची स्थापना करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. चोरीचा फटका बसणाऱ्यांनी याबाबत आगार प्रमुखांकडे सांगीतले असता, “आम्ही काही करू शकत नाही!" असे बेजबाबदारपणाचे उत्तर प्रवाशांना ऐकावे लागत आहे. त्यातचं पोलिस स्टेशनमध्ये जावून तक्रार नोंदविण्याचा वेगळा मनस्ताप यामुळे अनेक जण तक्रार न नोंदविताचं परत येत
असतात.
गुरूवार दि. १३ एप्रिल रोजी गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यापारी नामदेव येरणे हे चंद्रपूरच्या बस स्टॉपवर गडचांदुर कडे येणाऱ्या बस ची वाट पहात असतांना त्यांच्यासमोरून एका १८-१९ वर्षाच्या मुलाने त्यांच्या खिशातील मोबाईल अलगद काढून त्याठिकाणाहून पसार झाला. याबाबत आरडा-ओरड केल्यानंतर त्यांनी आगार प्रमुखांकडे याबाबत ची माहिती दिली असता त्यांना बेजबाबदारपणाचे उत्तर देण्यात आले व पोलिसांकडे तक्रार देण्याची सुचना करण्यात आली. पुर्वीचं डोळ्यादेखत मोबाईल चोरीला गेल्याने त्रस्त झालेल्या येरणे यांनी पोलिसांकडे जाऊन आणखी मनस्ताप ओढावण्याचे टाळले. महत्वाचे म्हणजे चंद्रपूर बस स्टॉप हे रामनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येते. पुर्वीच्या बस स्टॉपवर एक पोलिस चौकी होती. आता मात्र नविन बस स्टॉप अशा घटनांना आवर घालण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
याबाबत गडचांदुरचे प्रतिष्ठित व्यापारी व काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नामदेवराव येरणे यांची प्रतिक्रिया घेतली असता, गुरूवार १३ रोजी बस स्टॉपवर गडचांदुर साठी बस ची प्रतिक्षा करीत असता माझ्या खिशातील मोबाईल एका युवकांने माझे देखत सफाईने लंपास केला. त्याबद्दलची माहिती देण्यास आगार प्रमुखांकडे गेलो असता त्यांनी अरेरावी च्या भाषेत उत्तरे देत पो.स्टे. तक्रार करण्याची सुचना दिली. बस स्टॉप पासुन पो.स्टे. थोड्या अंतरावर आहे. बस स्टॉप परिसरात पोलिस चौकी राहिल्यास त्याठिकाणी जाऊन तक्रार करणे सोयीस्कर जाईल व अश्या घटनांवर सुद्धा आळा बसू शकेल व होणारा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. सदर प्रकरणाची पोस्टाने करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. अशा घटना याठिकाणी यापुर्वी ही झाल्या असतील परंतु माझेसारखी अनेकांनी होणारा मनस्ताप टाळण्यासाठी तक्रार देण्याचे टाळले असेल तरी या परिसरात एक पो.स्टे. ची निर्मीती करून अपराधिक घटनांवर आळा बसविण्यासाठी एस.टी. आगार प्रमुखांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
0 Comments