दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना मुल येथे भावपूर्ण श्रद्धांजली.#A moving tribute to the late MP Balubhau Dhanorkar at Mul.

 

दिनांक ७ जुन रोजी जनसंपर्क कार्यालय मारकवार कॉम्प्लेक्स मुल येथे माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती .याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी शोकसभेत शोक संवेदना व्यक्त करतांना सांगितले की, एक लढवय्या नेता आपल्यातून हिरावून घेतला आहे, सर्वांना घेऊन चालणारे धाडसी व खंबीर नेतृत्व होते, सामान्य जनते मध्ये अतिशय लोकप्रिय होते. याप्रसंगी विनोद अहिरकर, अजिंक्य प्रकाश पाटील, किरण पोरेडिवार, विक्रम गुरूनुले, अशोक पुल्लावार, महेश कटकमवार, नरेंद्र चौधरी, विनायक झरकर, राकेश येनुगवार , महेश पेंदोर, हंसराज मेश्राम, पंकज पु ल्लावार, आशिष अहिरकर, मंगेश बत्तु लवार , शरद गणवीर, अरविंद कडस्कर,संदीप चिंचोलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी शोक संवेदना व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments