नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पावडे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला तत्पर !
चंद्रपूर :- मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकर अतिवृष्टीचा सामना करीत आहेत.18 व 20 जुलैला अतिवृष्टी झाली.परिणामी हजारो घरात पाणी शिरले.यात लोकांचे अतोनात नुकसान झाले.अश्यास्थीतीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तपणे नागरिकांच्या मदतीला गेले पाहिजे. पूर सदृश्य भागाची पाहणी करून नागरिकांची मदत करा अश्या सूचना मंत्री-वने,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्य(म.रा.) आणि पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. विषयाचे गांभीर्य ओळखून भाजपाची टीम नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात मैदानात उतरली आहे. मागील एक आठवड्यापासून चंद्रपुरात मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वस्त्यांत पाणी शिरले असून नागरिकांचे हाल होत आहे, ज्या भागात पाणी शिरले त्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार भाजपची टीम सक्रिय झाली आहे.
यात प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, राहुल घोटेकर, देवानंद वाढई जयश्रीताई जुमडे, छबुताई वैरागडे, सविता कांबळे, शीला चव्हाण, शीतल गुरनुले, प्रशांत चौधरी, वंदना तिखे, शीतल अत्राम, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलवार, संदीप आगलावे, रवी लोणकर, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, माजी नगरसेवक रवी आसवानी, अजय सरकार, श्याम कनकम ,किशोर अत्राम, चांद सय्यद, प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षीरसागर, सुनील डोंगरे, सूरज पेदुलवार, मनोज पोतराजे, रामकुमार अकपेल्लीवार, प्रवीण उरकुडे, राजेश यादव, स्वप्नील कांबळे, सागर भागत,भानेश मातंगी, आदींचा समावेश आहे. जुलै महिन्यात मागील काही दशकातील सर्वाधिक पाऊस झाला.ढगफुटी सदृश या पावसामुळे महानगरातील अनेक घरात पाणी शिरले.परंतु हे पाणी 2 तासात खाली झाले.तिसऱ्या दिवशी बॅक वाटरने कहर केला.इराई धरण भरलेले नसतांना पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली.जुलै महिन्यात जलनगर, महाकाली वॉर्ड, रहमतनगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादीनगर, द्वारकानगरी, तुकुम परिसर, वडगाव, शास्त्री नगर, बंगाली कॅम्प इंदिरा नगर,जगन्नाथबाबा नगर आदींचा प्रामुख्याने समावेश होता.या सर्व परिसराचा मनपा आयुक्त व तहसीलदारांना सोबत घेऊन पाहणी करून मदत करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले.त्यामुळे सर्व पदाधिकारी कामाला लागले असून पूर पीडितांना शक्य ती मदत दिली जात आहे.नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते.ती किती भयावह असेल याचा अंदाज घेता येत नाही.अवघ्या 8 तासात प्रचंड पाऊस होवून महानगर जलमग्न होईल असे कुणालाही वाटले नाही.असे असले तरी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या नैसर्गिक आपदेची दखल घेतली आहे.उत्पन्नस्थितीचा अभ्यास केला जात आहे.लवकरच यावर उपाययोजना होतील.
मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन!
भारतीय जनता पार्टी नागरिकांच्या पाठीशी आहे. मदतीची आवश्यकता असलेल्यांनी संपर्क साधावा असे आवाहन भाजपचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी नागरिकांना केली आहे.
0 टिप्पण्या