स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम ! The late MP Balu Dhanorkar's birth anniversary today various programs!


चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीशी संलग्नित सर्व फ्रंटलच्या वतीने आयोजन !

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचे आवाहन !


चंद्रपूर :  चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीशी संलग्नित सर्व फ्रंटलच्या वतीने आज मंगळवारी (ता. ४) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुणांना फळवाटप करण्यात येणार आहे. नौशाद शेख, राहुल चौधरी आणि चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्ता यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होईल. दुपारी १२.०० वाजता माता महाकाली मंदिर परिसरात भक्तांसाठी भोजनदान केले जाणार आहे. चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी १.०० वाजता चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढकारातून मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठांना भोजनदान, कपडे वाटप केले जाणार आहे.

दुपारी २.०० वाजता सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, बाबुपेठ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम चंद्रपूर शहर जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव यांच्या पुढाकारातून होईल. सायंकाळी ५ वाजता शक्तिनगर, वेकोलि दुर्गापूर वसाहत येथे इंटकचे नेते के. के. सिंग यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ७.०० वाजता डेबू सावली वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना भोजनदान केले जाईल. हा कार्यक्रम अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, निशा धोंगडे, सागर खोब्रागडे यांच्या पुढाकारातून होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना काँग्रेस कार्यकर्ते, स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह अन्य आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments