Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

RTO ला पडला परिवहन खात्याच्या निर्णयाचा विसर ! RTO forgot about the decision of the transport department!


चंद्रपूर (का. प्र . )

राज्यात १८ वर्षाहुन कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी ५० सीसी हुन जास्त क्षमतेचे वाहन चालवतांना आढळल्यास त्यांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा कोणताही परवाना न देण्याचा निर्णय तसेच २५ हजार रूपयांपर्यंत दंड व २५ वर्षापर्यंत कोणतेही वाहन चालविण्याचा परवाना दिला जावू नये, असा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. परंतु परिवहन खात्याचे संकेतस्थळ व ॲपवर अशा कारवाईची सुविधा किंवा कोणतीच माहिती नाही. राज्यातील परिवहन विभागालाचं आपल्या खात्याच्या निर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील सुधारणेनुसार ही कारवाई होणार आहे. परंतु संबंधित संकेतस्थळावर व ॲपवर अशा कारवाईची सुविधा किंवा माहिती नाही. परिवहन खात्याने राज्यात हेलमेट न घालणाऱ्या व परवानाविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु १८ वर्षाखालील कुणी ५० सीसीहुन जास्त क्षमतेचे वाहन चालवतांना पकडल्यास त्याला असलेल्या शिक्षेची, २५ वर्षापर्यंत परवाना न देण्याच्या सुचनेचा विसर परिवहन विभागाला पडल्याचे दिसत आहे. यासंबंधात प्रत्यक्ष माहिती घेण्याचा प्रयत्न केला असल्यास यासंबंधात कुणाही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.


दोन दिवसांपासून शाळेला प्रारंभ झालेला आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरीता पुन्हा स्कुल बसेस रस्त्यांवर फिरतांना दिसत आहे. योग्यता प्रमाणपत्र असेल तरचं शाळेच्या बस मध्ये आपल्या पाल्यांना पाठवा असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून या स्कुल बस च्या योग्यतेबाबत प्रमाणपत्र घेण्याच्या सुचना कोणत्याही शाळा व्यवस्थापनाला दिल्या नसल्याचे कळते. शाळा सुरू होण्यापुर्वी स्कुल बसचे योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. मिळालेल्या माहितीनुसार ४० टक्के स्कुल बस चे अद्यापपावेतो योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे कळते.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये ७०० पेक्षा जास्त स्कुल बस ची नोंदणी करण्यात आली आहे. शासनाचे नियमानुसार या स्कुल ची नोंदणी केली जाते. व दरवर्षी स्कुल बस ची पडताळणी करून त्याचे योग्यता प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्याची जबाबदारी ही शाळा 'सचालकांची असते. नदुरूस्त स्कुल बसेसमुळे अपघाताची शक्यता जास्त असते. परंतु शाळा संचालक जाणिवपुर्वक 'आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी शासन नियमांची पायमल्ली करीत या स्कुल बसेसची पडताळणी करीत नाही. योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या स्कुल बसवर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहे. शाळा सुरू होऊन दोन दिवस होत आहे. आपले पाल्य ज्या बसने शाळेत जात आहे काय ? त्या बसचे योग्यता प्रमाणपत्र आहे काय याची पडताळणी करण्याची जबाबदारी पालकांची आहे. तशी त्यावर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाची आहे. या विभागाकडे किती स्कुल बस ची त्यांचेकडे नोंदणी करण्यात आली आहे. आणि किती स्कुल बस नी अद्यापपावेतो योग्यता प्रमाणपत्र घेतले नाही. त्यांचेवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. नादुरूस्त स्कुल बसमुळे यापुर्वी जिल्ह्यात दुर्घटना झालेल्या आहेत, या गंभीर बाबीकडे परिवहन विभागाने त्वरित लक्ष द्यावे. नुकतीच रस्ता सुरक्षा समितीची जिल्ह्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अपघात टाळण्यासाठी अनेक सुचना करण्यात आल्या. त्या सुचनांचे पालन स्कुल बस चालविणाऱ्या शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येते काय याची पडताळणी गंभीर बाब म्हणुन जिल्हा प्रशासनाने करायला हवी.

 चंद्रपूर चे आरटीओ कार्यालय उपप्रादेशिक पासून आता झाले प्रादेशिक कार्यालय !चंद्रपूरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे ते नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित येत होते. परंतु जिल्ह्याचा विस्तार वाढत चालला असल्यामुळे तसेच जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी सह इतर ही वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभुमीवर शासनाने २३ जुन रोजी काढलेल्या अध्यादेशात राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन विभागाचा दर्जा वाढवुन प्रादेशिक कार्यालयात त्याचे रुपांतर केले आहे. चंद्रपूर सह राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे.  

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर झाल्यामुळे अपील प्राधिकरण चंद्रपूर येथे झाल्याने वाहन चालकांना नागपूरला जाण्याचा त्रास वाचला आहे. नव्या आकृतीबंधानुसार पदेश भरण्यास मंजुरी मिळाली असल्याने आता उउप्रोदिशक परिवहन अधिकारी कार्यालयात पुर्वी ४० पदाचा आकृतीबंध होता. मात्र आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर झाल्याने नव्याने ६६ पदांचा आकृतीबंध मंजुर झाला असून  यामध्ये उपप्रादेशिक परिहवन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपीक, लिपीक, टंकलेखक, वाहनचालक आदि पदांचा समावेश आहे. आता नागरिकांची कामे  चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिनस्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणुन गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार आहे. तर राजुरा हे सीमा तपासणी नाका राहणार आहे. 

Post a Comment

0 Comments