मूल येथे ३ डिसेंबरला पहिले
महिला साहित्य संमेलन !
चंद्रपूर (लक्ष्मण खोब्रागडे)
साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत . त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार , २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार , २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार , २०१९ ला योग समितीच्या वतीने जाहीर सत्कार , २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार , २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे .
मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमाला भोयर!
साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांचे सामाजिक कार्य अपूर्व आहे . २००२ पासून त्या बालसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात .
पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर , झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सचिव लक्ष्मण खोब्रागडे , मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम , मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
0 Comments