तरीही श्रद्धेय अटलबिहारी यांनी कां केली मुनगंटीवार यांची प्रशंसा ! Still why respected Atal Bihari praised Mungantiwar !




कौन है यह सुधीर मुनगंटीवार? भविष्य में यह लडका जरूर उन्नती करेगा!

सन १९८०-१९९० च्या आसपास चंद्रपूर जिल्ह्यात भाजप (भारतीय जनता पार्टी) चे ध्येय-धोरण तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्तासारखी आधुनिक साधने नव्हती. भाजपला बदनाम करण्याचे व भाजप एका विशिष्ट वर्गांची- लोकांची आहे, अशी भाजपची "प्रतिमा" त्यावेळच्या काॉंग्रेसी नेत्यांनी निर्माण केलेल्या षडयंत्रामध्ये कांग्रेसी यशस्वी ही झाले होते. 
त्याचवेळी सन १९८९ मध्ये २६-चंद्रपूर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती. चंद्रपुर लोकसभेचे उमेदवार कोण राहतील, यांची शोधमोहीम सुरू होती. त्यावेळचे भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. दादा देशकर, रमेशचंद्र बागला सारखे नेते वयोमानानुसार क्षिण झाले होते. अॅड. दादा देशकर हे भाजपचे उमेदवार रहायचे. आत्ता चंद्रपूर लोकसभेला कोण लढेल यांची चर्चा भाजपच्या दिल्ली दरबारी सुरू झाली होती. दिल्लीमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या नेत्यांना पेच पडला असतांना चंद्रपूर चे भाजपचे ज्येष्ठ चंदनसिंह चंदेल, रमेशचंद्रजी बांगला या त्यावेळच्या जून्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारांची कोंडी सोडवित अडवाणीजी-अटलजी यांचेपाशी सुधीर मुनगंटीवार यांचे नांव उमेदवार म्हणून समोर केले. नुकतेचं युवावस्थेत, काॅलेज जीवनात एबिव्हीपी मध्ये कार्यरत असलेला सुधीर या साऱ्यांपासून बिलकुल अनभिज्ञ होता. भारतीय जनता पार्टी ची सुधीर ची उमेदवारी चंदेल काका चंद्रपुरात घेऊन आले. वरिष्ठ नेत्यांचा आदेशाचे पालन करीत सुधीर ने बलशाली काॉंग्रेसच्या बलाढ्य उमेदवार शांताराम पोटदुखे यांच्या विरोधात युवावस्थेत पक्षादेश मानुन आयुष्यातील आपली पहिली निवडणुक लढविली, त्यांना हार पत्करावी लागली, पण दिल्ली मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी "कौन है यह  सुधीर मुनगंटीवार! भविष्य में यह लडका जरूर उन्नती करेगा!" असे गौरवोद्गार काढले. त्यांचे कारण ही तसेचं होते नवखा सुधीर भाजप उमेदवार म्हणून फक्त दुसऱ्या क्रमांकावरचं राहिला नाही  तर भाजपला पहिल्यांदाच चंद्रपूर लोकसभेमध्ये  त्याखेपेला ३१.८२ टक्के (१,९३,३९७) मते मिळाली  होती.

मतांच्या टक्केवारीत भाजपची झालेली वाढ सुधीरमुळे होती म्हणूनचं श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांची थोपटलेली "पाठ" त्यांच्यासाठी प्रेरणादायी राहिली. त्यानंतर पक्ष आदेशाचा आदर करीत सुधीर ने १९९१ मध्ये ही कांग्रेसी उमेदवार शांताराम पोटदुखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविली, त्यावेळीही त्यांनी १,२३,१२२ मते घेतली.  इतिहास ठाऊक नसलेले आजचे कांग्रेसी मुनगंटीवार यांची ती "हार" गर्वाने सांगत असले तरी कांग्रेस पक्षाच्या चंद्रपूरात पराभवासाठी फुंकलेला पहिला शंखनाद  होता, यांची आठवण आजही जुने-जाणते राजकीय  जाणकार सांगतात ! 
----------------------------------------------
Also Read

-----------------------------------------------

क्या हार में, क्या जीत में!
किंचीत भयभीत नहीं मै..!!
कर्तव्यपथ पर जो भी मिला..!
यह भी सही, वों भी सही...!!
वरदान नहीं मागुंगा...!
हो कुछ पर हार नहीं मानुंगा...!!

या अटलजींच्या प्रसिद्ध काव्यपंक्तीला साजेशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील  यशस्वी वाटचाल राहिली आहे. आज पक्षाने सुधीर ला पुन्हा एकदा लोकसभा लढण्याचा आदेश दिला. कर्तव्याच्या वाटेवर त्यांनी जिल्ह्यात उभारलेला विकासाचा रथ मतदारांना दाखवित लोकसभा लढवित आहे  व मतदारांना आशिर्वाद रूपी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल,  मतदार राजा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ नक्कीच घालेल, यात संशय नाही.

Post a Comment

0 Comments