चंद्रपूर (वि.प्रति.) : रामनवमी ला १७ तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात एकंदर १८ लाख ३० हजार ९७६ मतदार आहेत. वाढलेले नवमतदार, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणुक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीमुळे मतदानाच्या टक्केवारीत होणारी वाढ बघता विजयाची माळ "गळ्यात" पाडण्यासाठी उमेदवाराला सहा लाखांपेक्षा जास्त टप्पा गाठायचा आहे, यासाठी फक्त तिन दिवस शिल्लक आहेत. आर्णी पासून जिवती च्या मतदारांपर्यंत अल्पावधीत उमेदवार पोहोचू शकले नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी, घटक पक्षांचे पदाधिकारी यांच्यावर उमेदवारांची भिस्त आहे. तर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील रूसवे-फुगवे उमेदवारांसाठी अजुनही डोकेदुखी वाढविणारे आहे.
---------------------------------------------------
Also Read....
---------------------------------------------------
दुहेरी लढतीत मत विभाजनांकडे उमेदवारांचे लक्ष !
राज्याचे वजनदार व पॉवरफुल मंत्री भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात दुहेरी लढत आहे. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला चंद्रपुर दौरा यामुळे ही निवडणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी आहे. विकासाचा मुद्द्यावर मुनगंटीवार मतदारांकडे मते मागीत आहेत तर महाराष्ट्रातील एकमेव प्राप्त कांग्रेसचे उमेदवार दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्या पत्नी आम. प्रतिभा धानोरकर यांना जातीय समीकरण व सहानुभूती याचा बऱ्यापैकी लाभ होणार असे सध्यातरी चित्र आहे. मत विभाजनाचा फार्मुला यशस्वीपणे हाताळणाऱ्या उमेदवाराला विजयाची वाट सोपी करणारा राहील. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले व बसपा चे उमेदवार राजेंद्र रामटेके यांना मतदार किती पसंती देतात व किती मतांचे कोणता उमेदवार विभाजन करण्यात यशस्वी होतात याकडे ही बघणे तेवढेचं महत्वाचे आहे.
"हे" मात्र अद्यापही गुलदस्त्यात !भाजपचे माजी खासदार व मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस हे अजुनही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला निघालेले दिसत नाहीत. तसेचं कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार वत्यांचे समर्थक कांग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला "मनाने" लागले असे म्हणता येत नाही. त्याचा ही मोठा फटका विभाजनाच्या स्वरूपात कांग्रेस उमेदवाराला बसू शकतो. कोण-कोणाकडे आहे "हे" मात्र अद्यापही गुलस्त्यात आहे. "कामाला लागण्याचे आदेश" पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळाले असले तरी निष्ठावान कुणाचे काम करतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
0 टिप्पण्या