बहुजन समता पर्व चे आयोजन !
हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे डॉ. दिलिप कांबळे यांचे आवाहन !
चंद्रपूर ( का . प्रति. )
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विशेष करून गरीब, एस.सी., एस. टी., ओबीसी, माईनॉरिसी व गरीब उच्च वर्णिय जनतेचे हाल, बेहाल होऊन त्यांचेवर समस्यांचा डोंगर उभा झालेला आहे. यासाठी चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी, आमदार व महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या असंवेदनशील, कर्तव्यशुन्य, कर्तव्य जबाबदारी धोरण जबाबदार असुन या विरोधात बहुजन समता पर्व, चंद्रपूर ने बुधवार दि. २८ ऑगस्टला भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथून हा 'जनआक्रोश मोर्चा' निघणार असुन मोर्चात जास्तीत जास्त प्रमाणात चंद्रपूरच्या जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन बहुजन समता पर्व चे मुख्य संयोजक व काँग्रेस चे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉ. दिलीप कांबळे यांनी आवाहन केले आहे. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. वैशाली टोंगे, विनोद लभाणे, राहुल देवतडे, ऍड मनोज कवाडे, प्रदीप जुलमे, राकेश नकले, धनवान डोके आदी उपस्थित होते.
Click करा व वाचा..>>>
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातंर्गत अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे . त्यात र्वच झोपडपट्टी धारकांना स्थायी पट्टे मिळायलाच पाहिजे, प्रधानमत्री शहरी आवास योजनेअंतर्गत महानगर पालिकेच्या हद्दीतील ओबीसी बांधवांचे पट्टे अभावी रोखुन ठेवलेले घरकुल पट्ट्याची अट रद्द करून त्यांना त्वरित घरकुल योजना मंजुर करून द्यावी, महानगर पालिकेच्या अमृत जल योजना अंतर्गत येणारे पिण्यांचे पाणी हे चंद्रपूरवासियांना दररोज २४ तास मुबलक प्रमाणात देण्यात यावे, विद्युत बिलामध्ये कमीत कमी २५% कपात करून बिल देण्यात यावे, महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पुर्ववत सुरू करण्यात याव्या, बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम त्वरित पुर्ण करून हा पुल जनतेसाठी खुला करण्यात यावा, अशा प्रमुख रास्त मागण्यांना घेऊन या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन 'आता नाही तर कधीच नाही' या भावनेने निघणाऱ्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहन्याचे आवाहन बहुजन समता पर्वाचे मुख्य संयोजक व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉ. दिलीप कांबळे यांनी केले आहे.
0 Comments