मनपा आयुक्तांच्या दालनात बाधंकामदारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न!!
चंद्रपूर (का.प्रति.)चंद्रपूर शहर झोन क्रमांक 01 मधील ब्लू लाइन अंतर्गत येणारे बांधकाम पाडण्याचे काम तूर्तास थांबविण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.या संदर्भात मंगळवारी(दि.27)मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्या दालनात भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व मालमत्ताधारक यांच्यात झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.दरम्यान या विषयावर कायमचा तोडगा काढण्यात येईल असे भरीव आश्वासन कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असल्याने मालमत्ता धारकांचा जीव भांड्यात पडला आहे.
चंद्रपूर शहर झोन क्रमांक 01अंतर्गत येत असलेल्या हवेली गार्डन, वडगाव, आकाशवाणी रोड आदी परिसरात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व्हेक्षण ,नुकतेच करण्यात आले.यात अनेक लोकांनी ब्लू लाईन क्षेत्रात घरे बांधल्यामुळे
बांधकाम धारकांना नोटीस बजावून बांधकाम त्वरीत हटविण्याचे निर्देश देण्यात दिले होते.मनपाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक नागरिक अडचणीत आले.याची गंभीर दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी मंगळवारी आयुक्तांची भेट घेत विषयावर चर्चा केली.या कारवाईमुळे या परिसरातील अनेक बांधकामधारकांचे नुकसान होणार होते.
चर्चेत निळी पूर रेषेअंतर्गत येणाऱ्या लोकांनीं तूर्तास बांधकाम करू नये अश्या सूचना आयुक्त पालिवाल यांनी केल्या आहेत. बांधकामधारकांच्या अडचणी लक्षात घेता, तूर्तास बांधकाम पाडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर बैठकीनंतर राहुल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली असता सदर बांधकाम पाडण्यात येणार नाही व निळी पूररेषा बाबत निर्णय घेवू असे आश्वासन बांधकाम धारकांना दिले आहे.
राहुल पावडे यांच्या मध्यस्थीने निळी पूररेषा अंतर्गत बांधकाम धारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
या , बैठकीत बांधकामधारकांसह देवानंद वांढई, रवि जोगी, रविंद्र देवाळकर, अमोल माथणकर, किशोर येवतुकर, शेखर ढक, सातरे सर, काकडे भालचंद्र धाडे, घोरपडे सर ,वांढरेजी , आदी उपस्थित होते.
0 Comments