सुधीरभाऊचा लढा !
तीनदा चंद्रपूर विधानसभा मतदार संघ आणि आता बल्लारपुर विधानसभा मतदार ballarpur संघातून दोनदा आमदार असलेले, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष असलेले व आता बल्लारपूर - मुल विधानसभा क्षेत्रातुन तिसऱ्यांदा निवडणुक लढविणारे सुधीरभाऊ सच्चिदानंद मुनगंटीवार sudhir mungantiwar हे महाराष्ट्राने ज्यांचा आदर करावा असे महाराष्ट्राला भुषण असलेले दिग्गज काँग्रेस पुढारी, माजी मुख्यमंत्री कर्मवीर मारोतराव उर्फ सांबाशिव कन्नमवार ह्या ध्येयवेड्या पुढाऱ्याच्या मूल - सावली या कर्मभुमीत त्यांचे स्मरण व्हावे यासाठी फार-फार अस्वस्थ होते. विचारभिन्नता असली तरी समोरच्या कर्तबगाराचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे यासाठी सर्व लोकशाही मार्ग वापरून कर्मवीर स्मारकाच्या पूर्ततेसाठी कामाला लागले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. चिकाटी - जिद्द - समर्पितता असली तर या जगात सर्वच शक्य आहे हा त्यांचा याबाबतचा ठाम विश्वास !
click..... मंत्र्यांनी फक्त अशी मागणी केली...!
असा केला प्रस्ताव सादर !
कर्मवीर दादासाहेब कन्नवार मंत्री - मुख्यमंत्री असतांना जनतेस दिलासा देणारे निर्णय घेणारे, जनप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे जनप्रतिनिधी, उज्वल प्रतिमेचे धनी, पारदर्शक प्रामाणिक प्रशासक राहिले आहेत हे ध्यानात घेता सुधीरभाऊंनी तत्कालीन मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण ashok chavan यांना २२/१/२०१० कर्मवीरांच्या मूल येथील स्मृती स्मारकाबाबत पत्र दिले. सन २०१० ला कर्मवीर कन्नवारांची १११ वी जयंती होती. मूल येथे अंदाजे पांच कोटी रूपये खर्च असलेल्या कर्मवीरांच्या मूल येथील स्मृती स्मारकात त्यांचा पुतळा, बगीचा, सौंदर्यीकरण असा वरील प्रस्ताव होता.
click...जगाच्या पोशिंद्याचा पाठीराखा सुधीरभाऊ !
पांच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध !
तत्कालीन व नियोजन मंत्री सुनील तटकरे यांना २८ जानेवारी २०१० ला पत्र पाठवून सदर स्मारकासाठी, सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या आश्वासनानुसार तटकरे यांनी सन २०१०-२०११ या वर्षाच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेला सादर करतांना या स्मारकासाठी पांच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केला.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार स्मृती स्मारक (मूल) संबधीचा शासकीय आदेश सामान्य प्रशासन विभागाने अपर सचिव भा. र. गावित यांनी ३ जाने. २०१२ ला काढला. प्रेक्षागृह इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, साऊंड सिस्टिम (ध्वनी व्यवस्था), स्टेज ड्रपेरी, चेअर्स - फर्निचर्स, ऑकास्टिक ट्रिटमेंट तसेच कर्मवीरांचा पुतळा याचा या शासकिय आदेशात स्पष्ट उल्लेख आहे. वरील शासकीय आदेशानुसार या स्मारकासाठी ४,९०,७४,८२२ रूपयाचा अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.
click......रतन टाटांनी केली होती मुनगंटीवारांची प्रशंसा !
ही बाब रेकॉर्डवर...!
या स्मारकाबाबत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी १९/७/२०१२ ला विधानसभेत अर्धा तास चर्चा ही उपस्थित केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की रामपूर येथील ७६ आर. जागा ११/७/२०११ ला उपलब्ध करून दिली असून निधीची कमतरता पडु देणार नाही.
सुधीर मुनगंटीवार यांनी ही बाब रेकॉर्डवर यावी म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, 'आपण या स्मारकाच्या उद्घाटनासाठी यावे.' मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 'सन्माननीय सदस्यांनी आम्हास बोलविले तर मी व उपमुख्यमंत्री तेथे अवश्य येवू.'
click.... विजयासाठी उमेदवारांची आकडेवारी ठरली !
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी दिले मान्यवरांनाआमंत्रण !
'स्मारकाचे मूल हे गांव माझे मूळ गाव असल्यामुळे तेथील जनतेच्या वतीने मी आपणास त्यासाठी आमंत्रण देत आहो.' असे आमदार देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यावेळी म्हणाले.
बैठकीत झाली साधक बाधक चर्चा !
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर स्मारक संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आमदारासह सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, चंद्रपूर जिल्हाधिकारी विजय वाघमारे, सर्वश्री अ. ल. मुसळे, भा. र. गावित, गजानन वा. गावंडे यांची उपस्थिती असलेल्या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली.
यासाठी दिली लक्षवेधी सुचना-हक्कभंग प्रस्ताव ! !
शासकीय कामाची संथगती ध्यानात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार स्मृती स्मारक (मूल, जि. चंद्रपूर) बाबतीत लक्षवेधी सुचना १४ मार्च २०१३ ला दिली. या स्मारकासाठी (कर्मवीर दादासाहेब कन्नमवार स्मारक) जो निधी लागेल तो शासन देईल असे आश्वासन विधानसभेत खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते याचा स्पष्ट उल्लेख करून सुधीर मुनगंटीवार यांनी सदर लक्षवेधी सुचना दिली होती. 'मुख्यमंत्र्यांच्या वरील स्पष्ट आश्वासन दिले असतांना अद्याप या स्मारकाच्या बांधकामासाठी निधी देण्यात आलेला नाही. प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाला अडीच महिन्याचा कालावधी लोटुनही अद्याप या स्मारकासाठी निधी उपलब्ध न होणे ही अतिशय गंभीर बाब आहे.' निधीच्या उपलब्धतेबाबत वित्त विभागाच्या उपसचिवांकडे मुनगंटीवारांनी विचारणा केली असता त्या उपसचिवाने उलट मुनगंटीवारांनाच प्रश्न केला, 'कोण कन्नमवार?' सदर हक्कभंग सूचनेबाबतची पार्श्वभुमी अशी आहे.
कर्जवसुलीसाठी तगादा लावणारा पठाणी सावकार !
पत्रव्यवहार, प्रश्नोत्तरे, अर्धा तास चर्चा, आश्वासन यावर विश्वास ठेवून स्वस्थ बसणे सुधीर मुनगंटीवार यांना तरी अजिबात जमतच नाही. ते कोणत्याही प्रश्नांवर तो प्रत्यक्षात सुटेपर्यंत मुख्यमंत्री, मंत्री, सचिव इत्यादिंच्या असा कांही तगादा लावून असा पाठपुरावा करतात कि तो जनप्रश्न, अन्य कोणतेही प्रश्न जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसतच नाही. तेंव्हा त्यांची भूमिका 'पठाणी सावकार कर्जवसुलीसाठी जसा तगादा लावतो' तसेच सुधीरभाऊंचे जनकार्य आणि जनप्रश्न सोडविण्यासाठी असते.
यामुळेच झाले. साकार !
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे त्यांच्या मूल येथील कर्मभूमीत स्मारक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सतत अभ्यासपूर्ण पत्रव्यवहार पाठपुराव्यातील सातत्य, गाठीभेटी यामुळेच साकार झाले.. आणि मूल शहरात थाटात उभे आहे. त्यांचे याबाबत जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असले तरी जनता-जनार्दन अजुनही त्यांच्यासारखेच असंतुष्ट आहेत याची सुधीरभाऊंनी गांभीर्याने नोंद घ्यावी कारण त्या सर्वांना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून असेच धडाकेबाज उपक्रम, जनविकास योजना - जनप्रश्नांची सोडवणूक मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या मूल येथील स्मृती स्मारकाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते ४ एप्रिल २०१७ रोजी लोकार्पण प्रसंगी साप्ता. विदर्भ आठवडी ने आपला विशेषांक प्रकाशित केला होता, ते आम्ही आमचे अहोभाग्य समजतो. त्याच विशेषांकातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांनी लिहीलेला हा लेख यानिमीत्ताने पुर्नप्रकाशित करीत आहे.
(साभार : साप्ता. विदर्भ आठवडी, चंद्रपूर)
0 टिप्पण्या