सबसिडीच्या नावाने कोळशाची करोडो ची चोरी !चंद्रपूर जी.एम. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना "आशिष" कुणाचा ?


नागाडा-पडोली च्या कोल डेपोवर उतरणाऱ्या सबसिडी च्या कोळसा चोरी प्रकरण! 

लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जी. एम. कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणींमधून उचलला जाऊन तो पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर संग्रहित करण्यात येत आहे.  कार्यालयीन कागदपत्रे रंगवून, केंद्र सरकार, वेकोलि व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक वेकोली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी मूर्ख बनवीत आहे. लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा हा कोळसा चोरट्या मार्गाने कोयला तस्करांपर्यंत पोचविण्यासाठी चंद्रपूर जीएम कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुणाचा "आशिष" प्राप्त झाला आहे याच्या तपास करणे आता गरजेचे झाले आहे.

 प्राप्त अधिकृत माहितीनुसार गुजरात येथील मेसर्स काठीयावाड कोल अन्ड कोक कंजूमर्स अन्ड ट्रेडर्स असोसिएशन व गुजरात कोल तथा गुजरात येथील अन्य डीलर्स यांना चंद्रपूर येथील चंद्रपूर जीएम कार्यालयातंर्गत येणाऱ्या कोळसा खाणीतून कोळशाची उचल करून वाहतुकीचे अधिकृत कंत्राट देण्यात आले आहे. हा कोळसा मध्यप्रदेशातील विद्युत उद्योगांना पोचता करण्यासाठी सबसिडीच्या दरात दिला जातो. महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन च्या माध्यमातून देण्यात आलेले हे कंत्राट अद्यापही सुरू आहे. उर्वरित कोळसा आता या खदानीमधून काढला जात आहे. खदानीतून निघालेला कोळसा सरळ संबंधित उद्योगापर्यंत पोहोचायला हवा परंतु तसे न होता, हा कोळसा चंद्रपूर जी.एम. कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंजुरी पेक्षा जास्त प्रमाणात उचल केल्या जाऊन शहरातील पडोली व नागाळा येथील कोल डेपोवर जमा करण्यात येऊन त्याठिकाणी त्याची छाटणी केल्या जाते व संबंधित उद्योगाला निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवून उच्च दर्जाच्या कोळशाचा काळाबाजार या या कोल डेपोवर केल्या जात आहे. संबंधित वेकोलिचे अधिकारी-कर्मचारी यांना यासाठी विशेष "आशिष" प्राप्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पडोली व नागाळा येथील कोल डेपोवर चालणारा असाच कोळशाच्या काळाबाजार पत्रकारांच्या चमूने उघडकीस आणला होता. करोडो रुपयांच्या या कोळसा चोरीचे घबाड उघडकीस आल्यानंतर वेकोलि प्रशासनाने महाराष्ट्र मायनिंग कार्पोरेशनचे करार रद्द केला. त्यानंतर वेकोली प्रशासनामध्ये खळबळ माजली होती. त्याच महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन ने मंजुरी दिलेला उर्वरित  कोळश्याची उचल आता करण्यात येत आहे.
देशात कोरोना या या आजाराने थैमान घातल्यानंतर अपराधाची संख्या शून्य झाली आहे. छोट्या-मोठ्या चोर्या करणाऱ्यांनी त्या थांबविल्या आहेत परंतु मोठे कोळसा तस्कर मात्र देशावर आलेल्या या संकटातही देशाला देशोधडीस लावण्यात अग्रेसर आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे. कोळसा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआय च्या माध्यमातून करावी व कोळसा तस्करांना कडक शासन करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Post a Comment

0 Comments