संकल्प संस्थेच्या माध्यमातुन डॉ. वासलवार यांनी केले महाकाली मंदिरात गरिबांना अन्नदान!


चंद्रपुर : कोरोना या आजाराने देशावर मोठे संकट कोसळले आहे. संपुर्ण देश आज लोकडाऊन करण्यात आला आहे. सामान्यजणांच्या रोजी रोटी चा मोठा प्रश्न उभा राहीला आहे. हीच  बाब  लक्षात घेऊन चंद्रपुर चे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक वासलवार यांनी रविवार दि. २९ मार्च 20  रोजी सकाळी 12.30 ते 3 वाजेपर्यंत  महाकाली मंदिर परिसरातील भिकार्यांची व कुपोषितांची भूक भागविण्यासाठी अन्नदान केले. 
चंद्रपुरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात अनेक निराधार भिक मागुन आपले पोट भरीत असतात. त्यासोबतच पुष्कळसे अनाथ याठिकाणी आश्रयास होते. कोरोनाच्या भितीने देशातील मंदिरांना कूलूपबंद करण्यात आले. त्यामधीलच एक म्हणजे माता महाकालीचे मंदिर आहे. कुलूपबंद महाकाली मंदिरामुळे आश्रीतांचे हाल होत आहे.

 कोरोनाने उद्भवलेल्या कठीण काळात हातावर पोट असणाऱ्या गोर गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. 
शासनाच्या विविध योजनांच्या परिघाबाहेर असणाऱ्यांचे काय? हा प्रश्न निर्माण होतोय .अश्याच अडचणींवर मात करण्या साठी किंबहुना त्या कमी करण्यासाठी चंद्रपुरातील नामवंत डॉ अशोक वासलवर हे त्यांच्या संकल्प संस्थे मार्फत पुढे आले असून  ते त्यांच्या संपूर्ण चमू सोबत त्यांच्या पर्यंत फूड पॅकेट पोहोचविण्याचे काम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या