"संकल्प" संस्थेचे मानवीय योगदान






          जगभर पसरलेल्या कोरोनाच्या कहरामुळे जनसामान्यांचे हाल झालेले आहेत.ह्या जागतिक महामारी मुळे संपूर्ण देशात लागू झालेल्या टाळेबंदीत हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे दिनदुबळ्यांचे व लहान मुलांचे हाल होऊ लागलेत. सामाजिक बांधिलकीची जान ठेवून अनेक सेवाभावी संस्था अश्या  अन्नावाचून जगणार्‍या समाजासाठी व त्यांची भूक शमवण्यासाठी पुढे आल्या.
        "संकल्प" या सेवाभावी संस्थेने खारीचा वाटा समजून या उपक्रमात उल्लेखनीय सहभाग घेतला.
       चंद्रपुरातील विविध झोपडपट्टीत जाऊन प्रथम गरजूंचे सर्वेक्षण करण्यात आले. महाविर नगर, अष्टभुजा वार्ड, प्रकाश नगर, संजय नगर, पडोली, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड, लखमापूर, हिंगलाज भवानी येथील झोपडपट्टीत जाऊन "संकल्प" संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त सैनिक, श्री व्यंकटेश हॉस्पिटलचे कर्मचारी गरजू वस्तीत स्वतः जाऊन 200 ते 250 अन्नाचे पॅकेट अविरत 17 दिवस रोज वितरित करीत होते. "संकल्प" च्या मानवी या उपक्रमामुळे लाभार्थींच्या चेहऱ्यावर तात्पुरते का होईना आनंद व हास्य उमटले.
अन्न वाटप करताना सुरक्षित अंतर, स्वच्छता, मास्क लावणे व जिल्हा प्रशासनाच्या अन्य नियमांचे पालन केल्या गेले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार , कोषाध्यक्ष डॉ. सिमला गाजर्लावार, डॉ राकेश कोलावार, श्री वासू शेंडे, श्री राजू वादिकर, श्री अविनाश राणा व  पूर्ण नियुक्त माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सेनाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य ह्या कार्याला लाभले. डॉ श्याम गुंडावार, डॉ सिमला गाजर्लावार, श्री सुरज बोडलावार, इनरव्हील क्लब चंद्रपूर, डॉ हर्षाली नांदे, श्री राज पामपट्टीवार, सौ मेघा सम्मावार, मिस श्रुती कांबळे, सरोज खोब्रागडे, शोभा ठाकरे, रेणुका खोब्रागडे, रोहित सुराना,हर्षवर्धन नागरकर, मिस अंजली खोब्रागडे, श्री गोकुळ कांबळे, विद्या ताकसांडे, सरिता झाडे, सौ ज्योती आडवाणी ,श्री आशिष बहाळे, माया डोईफोडे यांची मौलिक मदत या शुभकामी लागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या