महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे.
हा किस्सा आहे महाराष्ट्रातील बीडच्या खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्या हिंदीचा. त्या काही कारणानिमित्त इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. त्या इंदिरा गांधींच्या कार्यालयात जात असतानाच इंदिराजींचा पारा काही कारणाने चढलेला होता आणि त्यांनी हातातली पेन्सिल टेबलवर आपटत कार्यलयातील शिपायाला दरडावले हे केशरबाईंनी बघितले. इंदिराजींचा पारा चढलेला असताना त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम होणे शक्य नाही असे केशरबाईंना वाटले. तेव्हा केशरबाई इंदिराजींना नमस्कार वगैरे करून लगेच जायला निघाल्या. तेव्हा इंदिराजींनी त्यांना विचारले:"केशरबाई आप इतने जल्दी वापस क्यू जा रही है?". त्यावर केशरबाईंचा प्रतिसादः "आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे बात करने का ये टाइम ठिक नही". अर्थातच इंदिराजींना आपटी म्हणजे काय ते कळले नाही आणि केशरबाईंनी पेन्सिल आपटून दाखवली आणि अर्थ सांगितला तेव्हा इंदिराजी खळखळून हसल्या. नंतर अनेकदा केशरबाईंना त्या "आज मैने पेन्सिल आपटी नही तो आप अपनी बात केह सकती है" असे गमतीने म्हणत असत.
_-------------------००००-------------
राजकीय किस्से...! आमच्या वाचकांसाठी...!!
हा संग्रहित सदर आम्ही आमच्या वाचकांसाठी सुरु करीत आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या.
0 Comments