फोन करा, आवश्यक पैसे द्या;मिळवा जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवाएकटे, वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी मनपाचा स्तुत्य उपक्रम


चंद्रपूर, 3 एप्रिल: देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. परंतु,या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सूट देण्यात आलेली आहे.

या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी होऊ नये व एकटे असणारे नागरिक,वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्ती यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने महानगरपालिका अंतर्गत अशा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून किराणा सामान,औषधे इत्यादी साहित्य घरपोच पोहचविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याकरीता मनपातर्फे कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित प्रभागातील वयोवृध्द नागरीक व दिव्यांग व्यक्तींनी दूरध्वनीद्वारे संपर्क केल्यास संबंधीत नागरीकाच्या खर्चाने किराणा सामान व औषध खरेदी करुन त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यासाठी नोडल अधिकारी म्हणून  प्रकाश बांते व सहायक नोडल अधिकारी म्हणुन  चिंतेश्वर मेश्राम, नागरी उपजिविका अभियान योजना, यांची नियुक्ती करण्यात येत आहे.संबंधित अधिकारी यांच्याद्वारे एकटे राहणारे वयोवृध्द व दिव्यांग नागरीक आणि यासाठी उक्त नियुक्त कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून साहित्य घरपोच मिळण्याची खात्री केली जाणार आहे.

नागरिकांनी सुद्धा नियुक्त केलेल्या कर्मचारी यांची खात्री करूनच त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू घ्यावे असे आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

एकटे असणारे नागरिक वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्ती यांनी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवेसाठी पांडुरंग खडसे 9423417536, सुषमा करमरकर 9420142513, रेखा पाटील 9096827402, रेखा लोणारे 9922620015, चिंगुताई मुन 8698216818 या  अधिकृत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

चंद्रपूर महानगरपालिका कक्षांतर्गत कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, सामान्य चौकशी इत्यादी माहितीसाठी 07172-254614 ‌या भ्रमणध्वनी क्रमांकावर नागरीकांनी  संपर्क  करावा.

Post a Comment

0 Comments