चंद्रपूर मनपाची मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर दंडात्मक कारवाई!   चंद्रपूर महानगरपालिकेने covid-19 च्या धर्तीवर लागलेल्या संचारबंदी नंतर 23 तारखेपासून मास्क न वापरणार व रस्त्यावर थुंकणार्यांवर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. गुरुवार दिनांक 23 रोजी मास्क न वापरणाऱ्या 124 लोकांवर कारवाई करीत 24 हजार 800 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकूनाऱ्या 3 व्यक्तींवर कारवाई करीत 300 रुपयाच्या दंड वसूल केला. 24 तारखेला 96 व्यक्तींकडून 18 हजार 600 रुपये वसूल करण्यात आले आहे. साथ रोगाची परिस्थिती पाहता नागरिकांनी शासन निर्देशांचे पालन करावे असे आदेश देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये जास्ती चिडली आहे.

Post a Comment

0 Comments