चंद्रपूर,दि 11 एप्रिल: संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, स्वस्त धान्य दुकानेच सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्नधान्य पुरवठा संदर्भात तक्रार, माहिती मिळविण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरु केलेली आहे.
राज्यात अन्नधान्य पुरवठा संदर्भात राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. अन्नधान्याच्या तक्रारीसाठी, माहिती मिळविण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हे असणार हेल्पलाईन क्रमांक:
राज्य हेल्पलाईन अंतर्गत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1800224950,1967 या नि:शुल्क हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा. तसेच 022-23720582,23722970,23722483 या हेल्पलाइन क्रमांकाचा सुद्धा नागरिकांना वापर करता येणार आहे. तसेच अन्न, नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाच्या helpline.mhpds@gov.in या ई-मेल वर तक्रार तसेच माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या संकेत स्थळावरील ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा वापर करता येणार आहे.
जिल्हा हेल्पलाईन अंतर्गत अन्नधान्य व सामान्य चौकशीसाठी 07172-251597 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 नागरिकांनी वापर करावा. अन्नधान्य पुरवठा संदर्भात तक्रार तसेच माहितीसाठी dsochandrapur@gmail.com या इमेलवर संपर्क करू शकता.
0 टिप्पण्या