बल्लारपूर : बल्लारशाह परिक्षेत्रा अंतर्गत मानोरा उपक्षेत्रतील राखीव वन कक्ष क्र. 448 मध्ये कवडजई गावालगत वनांच्या 1 हेक्टर क्षेत्रात सात इसमांव्दारे करण्यात आलेले अतिक्रमण आज शुक्रवार दि. 29 मे 2020 ला काढण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांचे मार्गदर्शनाखाली मानोरा चे क्षेत्र सहाय्यक एस. एम. देठेकर, वनरक्षक के. एस. पोडचेलवार, एस. डी. जुमडे, पि. टी. रामटेके, डि. एल. उमरे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पार पाडण्यात आली.
सदर क्षेत्रामध्ये गुरे प्रतिबंधक चर खोदकाम करुन रोपे लागवड करण्यात येणार आहे. पुढील चौकशी क्षेत्र सहाय्यक मानोरा श्री. एस. एम. देठेकर हे करीत आहे.
0 Comments