चारगाव येथे विहिरीत आढळला मृतदेह!सावली : सावली तालुक्यातील चारगाव येथे सादागड रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. घटनास्थळी सावली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राठोड यांनी चौकशी केली व मृतदेह विहिरीतून काढल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. विलास कोमलवार रा. मुल यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. सदर व्यक्ती मागील काही दिवसांपासून चारगाव येथे नातेवाईकांकडे राहत होता. व मागील 4 ते 5 दिवसांपासून चारगाव येथून तो बेपत्ता होता.

सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला व शवविच्छेदनाकरीता सावली ग्रामीण रुग्णालयात शव पाठविण्यात आले. त्या व्यक्तीच्या मृत्यूच रहस्य अजूनही स्पष्ट झाले नाही. ही हत्या आहे की आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. हत्या असेल तर कोणी केली? किंवा आत्महत्या असेल तर ती कशासाठी केली? याबाबत तर्कवितर्क केल्या जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत असून त्यात आणखी एक भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments