शहरातील एका सदनिकेतील सदस्यांची आरोग्य होणार आरोग्य तपासणी?
चंद्रपूर : चंद्रपुरात काल दोन मे रोजी कोरोना बाधित आढळल्यामूळे एमईएल प्रभाग क्रमांक 3 मधील कृष्णनगर, केरला काॅलनी, उत्तरेकडील कृष्णनगर एंट्री गेट, दक्षिणेकडील हनुमान टेकडी, पूर्वेकडील रेल्वे पूलिया, पश्चिम भागातील नाला याठिकाणी नागरिकांचे हित व सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात आले आहे. या संपूर्ण भागामध्ये 28 ठिकाणी पोलिसांची कडक नाकाबंदी असून जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा वगळता कुणालाही या क्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे कालच स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाकडून आरोग्य विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे कळते. रूग्ण चौकीदार असल्याचे सांगत असला तरी तो वाहन चालक असून तो आपल्या वाहनाने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करीत होता यासारख्या अनेक अफवांना आज शहरात पेव फुटला होता. बाधित रूग्णांची कोरोना रिपोर्ट काल रात्रोपासून वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये व्हायरल झाल्यामुळे रुग्णांविषयी या चर्चांना पेव फुटला आहे. बाधित रुग्ण नक्की काय करतो, यावरच चंद्रपुरात पुढे काय घडेल हे सांगता येईल, रुग्ण बद्दलची खरी माहिती काय आहे हे येणारा काळच सांगेल. आढळलेला रुग्ण यापूर्वी कोणाच्या संपर्कात आला होता कां?, रुग्णाच्या जिल्हा बाहेर प्रवास झाला होता का?, रुग्णांची कुणाच्या संपर्क आला या सर्व बाबींच्या चौकशीमध्ये रुग्णांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर अडचणी वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील मुख्य मार्गावरील एका सदनिकेमध्ये आरोग्य तपासणी सुरू असून या सदनिकेत रुग्ण चौकीदार म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णाचे नातेवाईक व कुटुंब यांनाही आता कोरोनटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णाची माहिती लीक झाल्यामुळे ऋग्णाबद्दल विविध चर्चांना शहरात फुटला आहे. सदर रुग्ण बाहेर कोणाच्या संपर्कात आला नाही तर त्याला संसर्ग कसा झाला हा विषय ही मोठ्या प्रमाणात शहरात चर्चिला जात आहे. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी छातीत दुखणे असल्याचे कारणावरून हा पन्नास वर्षे इसम रुग्णालयात दाखल झाला रुग्णाला ताप, खोकला, निमोनियाची ही लक्षणे होती. त्यामुळे त्याला आयसोलेशन मध्ये भरती करण्यात आल्यानंतर त्याच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते. आज आरोग्य विभागाने रुग्णां कडून माहिती काढून रुग्ण ज्यांच्या त्यांच्या संपर्कात आला त्यांच्याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण जिल्हा बाहेर कुठेच गेला नसल्यामुळे तो बाधित कसा झाला हा चिंतेच्या विषय आहे.
रुग्णाचा रिपोर्ट लीक झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
चंद्रपुरात मिळालेला कोरोना बाधित रुग्णाची शासकीय अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर बाधित रूग्णाचा मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाला होता. हा मेडिकल रिपोर्ट व्हायरल कसा झाला हा संशोधनाचा विषय आहे? आरोग्य यंत्रणेच्या कार्यावर यामुळे प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. मेडिकल रिपोर्ट लिक झाल्यामुळे बाधित रूग्णांची माहिती त्याच्या कुटुंबाविषयी ची संपूर्ण माहिती आज साऱ्यांनाच कळली आहे यामुळे त्याच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना येणाऱ्या काळात त्रासाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य विभागाची गोपनिय रिपोर्ट एकाएकी कशी काय बाहेर येते ? आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
1 Comments
Big mistake in Test report viral on whatsapp patient is male but in report it's showing Female 😒😒
ReplyDelete