भद्रावती चा रेती माफिया "वासुदेव" !
रेती तस्करी हा पूर्वीपासूनच वादाचा राहिलेला विषय आहे. करोडो रुपयांची माया जमविणाऱ्या या व्यवसायाला अधिकाऱ्यांचे नेहमीचं पाठबळ राहिले आहे. नदी-नाल्यांना पोखरून, पर्यावरणाला भयंकर नुकसान करून, सामान्यजनांच्या आरोग्याशी खेळून पैशाच्या "ढिग" जमा करणारे असे "करंटे" जिथे शोधाल तिथे दिसतात. शहर-गाव-जिल्हा-तालुका स्तरावर असे "नतद्रष्ट" पहायला मिळतात. संचार बंदीनंतर रोजीरोटी कमावणारा घरचा कर्ता पुरुष घरीच बसला परंतु कोळसा, रेती, गुटखा याची तस्करी या चाळीस ही दिवस जोराने सूरू राहिली. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात असे "नतद्रष्ट" यांचे प्रमाण भरपूर आहे. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांशी सांठगांठ करून चालणारी ही चोरी आज लपलेली नाही. भद्रावती येथील अशाच एका रेती माफियाचे "रेती तस्करी पुराण...!"
भद्रावती च्या नद्या-नाल्यातील रेती अधिकाऱ्यांशी सांठ-गांठ करून चोरायची व त्याच्यात साठा जमा करून तो शासकीय कामात लावायचा व्यवसाय मागील अनेक वर्षापासून भद्रावती येथील वासुदेव नामक रेती माफिया करीत आहे. अधिकाऱ्यांशी व्यावसायिक सांठ-गाठमुळे अफाट माया याने जमा केली आहे. भद्रावती तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी वासुदेव नामक हा रेती माफिया करीत असल्याचा व त्याच्यासोबत भद्रावती तहसीलदार हे त्या कामात भागीदार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, अर्थात त्यामुळेच या रेती माफियावर कुठलीही कारवाई न करता तहसीलदार यांनी केवळ छोट्या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करून विदर्भातील सर्वात मोठ्या रेती माफियावर कारवाई करण्याचे जाणीवपूर्वक टाळले असल्याचे दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वतःला खासदार-आमदार यांच्या जवळचा संबंध असल्याचे दाखवून वासूदेव नामक हा रेती माफिया गैरमार्गाने माजरी वेकोली क्षेत्रात व सभोवतालच्या गाव-शिवारात शेकडो हायवा ट्रक रेतीची साठवणूक करित आहे. वेकोली माजरी परिसरातील रेती साठा हटविण्याबाबत वेकोली अधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र दिले असतांना सुद्धा तहसीलदार हे या रेती माफिया ला वाचण्यासाठी ही बाब वेकोली प्रशासनावर ढकलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . त्यामुळे कोट्यावधी रुपयाची रेती तस्करी होऊन शासनाचा महसूल स्वतः तहसीलदार हेच बुडवितअसल्याने रेती माफिया यांच्यासोबत तहसीलदार यांची भागीदारी तर नाही नां ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या रेती माफियाच्या अवैध धंद्याचे स्त्रोत हळू-हळू समोर यायला लागले असून कमी काळात त्यांची वाढलेली अमाप संपती सर्वाना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे, त्यामुळे आता जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार आणि वासुदेव नामक रेती माफिया यांच्यावर त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत असल्याने या रेती माफियाच्या मुसक्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कशा आवळल्या जाणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
0 टिप्पण्या