नांदेड ला पाठविण्यात आलेले "ते" तिन इसम अफवेचे बळी!



(चंद्रपूर विशेष) : गुरुवार दिनांक 7 मे रोजी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातून 3 जणांना नांदेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले. नांदेड येथून पळून आलेले ते पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या संशयावरून त्यांना नांदेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. परंतु नांदेडला पाठवण्यात आलेले ते तीन ही इसम अफवेचे बळी पडल्याचे वृत्त आहे. नांदेड येथे गुरुद्वारा मध्ये पाॅझिटिव्ह असलेल्या २० रूग्णांपैकी ४ रुग्णांनी नांदेड येथून प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. त्यासंबंधात नांदेड जिल्ह्यात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यातील एक रुग्ण नांदेड येथेच आढळला. उर्वरित तिन रुग्णांचा नांदेड पोलीस तपास करीत होती. मंगळवार दि. 4 मे रोजी पळून गेलेले "ते" तीन रुग्ण गडचांदूर येथे आले असल्याच्या संशयावरून चंद्रपूर पोलिसांनी त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात क्वारनटाईन केले, त्यानंतर नांदेड येथून पळून आलेले हेच ते रूग्ण अशा चर्चेला पेव फुटले. नुकतेच चंद्रपूर पोलिसांनी त्या तीनही इसमांना नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार त्याच दिवशी नांदेड येथे फरार ३ रूग्णांपैकी एक रूग्ण नांदेड येथे पोलिसांना आढळल्यानंतर आणखी फरार दोन रुग्णांचा नांदेड पोलीस तपास करीत आहेत. हे ते "पाॅझिटिव्ह" फरार रूग्ण नाहीत याची खात्री झाल्यानंतर चंद्रपूर येथून नेलेल्या त्या तीन ही इसमांना नांदेड येथे क्वारनटाईन करण्यात आले असून विनाकारण पसरलेल्या अफवांचा चंद्रपूरातील "हे" इसम बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर येथून त्यांना हलविण्या पुर्वी या तीन ही इसमांनी एक व्हिडिओ जारी करत आपण पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे सांगीतले होते. ते काम करीत असलेल्या ठिकाणाचाहि त्यांनी या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता.


चंद्रपुरातील एकमेव पॉझिटिव्ह
रुग्णाची प्रकृती स्थिर!

चंद्रपूर शहरात 2 मे रोजी आढळलेल्या कृष्ण नगरातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाला कोविड व्यतिरिक्त आजारासाठी यापूर्वीच नागपूरला दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 89 नागरिकांपैकी 57 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. 57 पैकी 49 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 8 अहवालाची प्रतीक्षा आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आतापर्यंत 89 व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून 64 नागरिकांचे गृह अलगीकरण करण्यात आले आहे. 25 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. कृष्ण नगर व लगतच्या सर्व परिसरातील एकूण 2 हजार 152 घरातील 8 हजार 540 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या भागातील नागरिकांच्या इन्फुन्झा सदृश्य आजाराची देखील तपासणी करण्यात आली. अशा प्रकारचे 5 रुग्ण संशयित होते. मात्र तपासणीअंती ते देखील निगेटिव्ह आले. तसेच अति गंभीर श्वसनाचा आजार असणाऱ्या आणखी 5 लोकांचे नमुने देखील निगेटिव्ह आले. संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील पत्नी, मुलगा व मुलगी यांचे निकाल देखील निगेटिव्ह आहे. आता 14 व 15 मे रोजी या रुग्णाची पुन्हा स्वॅब तपासणी होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या जिल्ह्यातील कोविड -19 परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. जिल्ह्यामध्ये विलगीकरण कक्षात भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 194 असून यापैकी194 व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.एका व्यक्तीचा निकाल पॉझिटिव्ह आला असून 175 नमुने निगेटिव आले आहे. या पैकी 18 नमुने अद्याप प्रतीक्षेत आहे. 175 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून‌ सध्या वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आजारासंदर्भात भरती असलेल्या व्यक्तींची संख्या 18 आहे. जिल्ह्यामध्ये सध्या तालुकास्तरावर 93 तर चंद्रपूर महानगरपालिका सरावर 128 असे एकूण 221 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी पर्यंत गृह अलगीकरण करण्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 42 हजार 276 आहे. यापैकी 36 हजार 816 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 13 हजार 182 नागरिक गृह अलगीकरणात आहे.

Post a Comment

0 Comments