अबब, "रेती" चोरीचे भद्रावतीत एवढे मोठे "घबाड" उघडकीस!


(वासुदेव चे रेती चोरी प्रकरण)


रेती तस्करी चे "अजब" कायद्याचे नियम "गजब"!
रेती तस्करी हा राज्यासाठी असलेला शाप आहे. प्रीती तस्करी मधून पर्यावरणाचा ऱ्हास होतो व मोठ्या प्रणाम प्रमाणावर प्रदूषण पसरण्यास मदत होते. परंतु रेती तस्करांवर यासंदर्भात मोठी दंडात्मक कारवाई केली जात असली तरी रेती तस्करी त्या प्रमाणात मात्र कमी झालेली नाही. 1 ब्रास रेती चोरी केल्यास 1 लाख 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला जातो. यातून पळ काढण्यासाठी रेती तस्कर सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी आपले सगळे चोर धंदे उरकून टाकतात म्हणजे अधिकारी जेव्हा कर्तव्यावर नसतात तेंव्हाच या चोऱ्या उरकून गेल्या असतात. बरं चोरी केलेली रेती अज्ञात ठिकाणावर साठवली जाते म्हणजे चोरी पकडली गेली तरी रेती मिळते पण रेती माफिया चा कोणताही सबळ पुरावा या ठिकाणी आढळत नाही ही रेती तस्करांनी लढविलेली रेती तस्करी ची अक्कल ! म्हणूनचं रेती तस्करी चे "अजब" कायद्याचे नियम "गजब" असे म्हणावे लागते.
  • उपविभागीय अधिकारी शिंदे यांची धाडसी कारवाई!
  • उर्वरित साठ्यांवर धडक कारवाई चे संकेत!
  • रेती माफिया "वासुदेव" च्या पाठीराख्यांनी "रेती साठा"बघून घातली "तोंडात बोटे"!
  • योग्य तपास झाल्यास "वासुदेव" वर होऊ शकतो करोडो रूपयांचा दंड!
  • राजकीय पाठबळ असल्याच्या "वासुदेव" च्या वल्गणांना विराम!

(भद्रावती विशेष) : भद्रावती येथील रेती तस्करी प्रकरण रेती माफिया "वासुदेव" याच्या जिव्हारी लागण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वृत्ताची दखल घेत गुप्त ठिकाणांवर छापा मारला असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती साठा त्यांनी जप्त केला. जवळपास 20 हायवा (अंदाजन 100 ब्रास) रेती चोरी साठा जप्त करण्यात आला आहे. शासकीय दराप्रमाणे यावर आकारण्यात ला येणारा दंड बघितला तर तो 20 लाखाच्या दरम्यान आहे. "ये तो ट्रेलर है पुरी पिक्चर अभी बाकी है" अशी स्थिती "रेती माफिया वासुदेव" च्या रेती चोरीची आहे. तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या मोकाट जागा "आपल्याच बापाचा" या थाटाने हा रेती साठा प्रत्येक रिकाम्या असलेल्या ठिकाणी जमा करण्यात आला आहे. पिंपरी, चारगाव-कूणाळा जवळच्या नदीपात्रातून जेसीबी, पोकलेन लावून रेती साठा उचलायचा आणि तो आजूबाजूच्या गावात जमा करायचा हा या "वासुदेव" याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून खुले आम सुरू आहे. राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याच्या "आव" दाखवून अनेक मोठ-मोठ्या चोरी प्रकरणात हा वासुदेव पूर्ण रंगला असल्यामुळे आता त्याचे त्याही "चोऱ्यां"चे बिंग बाहेर येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. नेत्यांशी जवळीक असल्याचा आव आणित असल्यामुळे त्याच्या विरोधात बोलायची कुणाची हिंमत होत नव्हती. रेती चोरीच्या या भयंकर लीला आता उघडकीस आल्या असून उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केलेल्या धाडसी कारवाईत फक्त मैकविल सिमेंट प्रॉडक्ट च्या ठीकाणाहून एवढा मोठा रेती साठा जप्त करण्यात आला असून आता आणखीन असे पाच ते सहा ठिकाणांवर धडकी कारवाई होणार असल्यामुळे आणखीन किती मोठ्या रेती चोरीचे घबाड उघड होईल, याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे. उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी ही धाडसी कारवाई करून अधिकारी असावा तर असा ही प्रतिमा जिल्ह्यात उभी केली आहे. जाणकारांच्या मते रेती तस्कर वासुदेव याच्या तालुक्यातील संपूर्ण अवैध साठ्यावर धाड टाकल्यास हजारो ब्रास रेती पुन्हा जप्त होऊ शकते. वासुदेवाच्या रेती तस्करीच्या "चोऱ्या" बघून त्याच्या पाठीराख्यांनी सुद्धा "तोंडात बोटे" घातली. पुढे होणारी कारवाई व त्यातून उघड होणारे "घबाड" बघता त्यांनीही आता वासुदेव पासून आपले हात वर केल्याचे कळते.
जिल्ह्यात अजून एका ही रेती घाटाचे लिलाव झालेले नाहीत, परंतु मोठ्या प्रमाणावर ही रेती चोरी होत आहे. काही नतद्रष्ट राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणावर होणारी हाणी येणाऱ्या काळात नैसर्गिक संकट निर्माण करणारी आहे. चंद्रपूर जिल्हा धन-वन या नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. या संपत्तीला "मोहमाया" च्या जाळात गुरफटून काही "करंटे" निसर्गाच्या कोप स्वतःहून ओढवून घेत आहेत. कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी समोर येऊन अशा काळात कृत्याच्या पर्दाफाश करणे गरजेचे आहे. उपविभागीय अधिकारी शिंदे हे त्या मोजक्या अधिकाऱ्यांमधीलचं आहेत, असे कारवाई निमीत्त म्हणावे लागेल. या कारवाईनंतर बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की सगळ्याच रेती साठ्यावर निर्भीडपणे कारवाई करून जमा झालेला हा चोरीची रेती साठा लिलाव करण्यात येऊन तालुक्यातील घर बांधकामासाठी त्याच्या वापर केला जाऊ शकेल. तसेच या प्रकरणात कोणतीही मुभा देण्यात येणार नाही या प्रकरणातील दोषींवर गडक शासकीय कारवाई करण्याच्या हेतू त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविला.

Post a Comment

0 Comments