जिवती : कुंभेझरी ते जिवती मार्गावरून एक इसम विक्रीसाठी विदेशी दारू आणत असल्याच्या माहितीवरून सापळा रचून जिवती पोलिसांनी सहा. पोलिस निरीक्षक विश्र्वास पूल्लरवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. या कारवाईत मॅकडाल नं. वन च्या 180 ml ने भरलेल्या दारू च्या 48 नग, ईपेरियल ब्ल्यु च्या 180ml ने भरलेल्या दारू च्या 24 नग व मोटार सायकल असा एकून 36,600 रू. चा विक्रीस येणारा दारूसाठ्यासह आरोपी नामे नेहरू आत्माराम राठोड, रा. जिवती यास अटक केली. तेलंगणा राज्यालगत असलेल्या जिवती, कुंभेझरी, गडचांदुर, राजुरा याठिकाणी विदेशी दारूचा पुरवठा होत असून तेलंगणा राज्यात कोरोना रूग्णांची स्थिती धोकादायक आहे. पैशाच्या लालसेपोटी काही असामाजिक तत्त्व दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करीत आहे. जिवती पोलिसांनी आत्तापर्यंत सहा. पो.नि. पुल्लरवार यांचे नेतृत्वात दारू विक्रीवर अनेक धाडसी कारवाया केलेल्या आहे. महत्त्वाचे म्हणजे विश्वास पुल्लरवार यांना नुकतेच पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि. 20 मे 2020 रोजी वाहनाने पेट्रोलींग करीत मौजा कुंभेझरी ते जिवती मार्गाने एक ईसम त्याच्या मोटार सायकलवर एका चुंगडीत विदेशी दारू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोहवा सुनिल लोहबडे ब.नं. 1973 सह पो.शि. 1394, 1892 यांनी मौजा देवलागूडा या गावासमोरील मंदीराचे बाजूला सापळा लावला असता एक ईसम मोटार सायकल क्र. MG-34-AH-2212 च्या डिक्कीवर दोन पांढऱ्या रंगाच्या चुंगड्या घेऊन येत होता. त्याची तपासणी केली असता मॅकडाल न. 1 कंपनी च्या 180 ml ने भरलेल्या दारू च्या 48 नग काचेच्या शिश्या कि.अ. 14400 र, ईपेरियल ब्ल्यु नी च्या 180ml ने भरलेल्या दारू च्या 24 नग काचेच्या शिश्या कि.अ. 7200 रू व मोटार सायकल अंदाजे किं. 15000 रु असा एकून 36,600 रू चा माल मिळून आला जप्त करण्यात आला. मुद्देमालासह नेहरु आत्माराम राठोड (30) रा. शांतीनगर, जिवती यांचे विरुध्द कलम 65 ( अ ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments